दिवाळीनंतरही लागोपाठ 4 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे बँकेशी संबंधीत काही काम असेल, तर सणाच्या काळात बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची लिस्ट जरूर चेक करा, ज्यामुळे तुम्हाला होणारा त्रास टाळता येईल. दिवाळीच्या पुढील दिवसात सुद्धा बँक लागोपाठ अनेक दिवस बंद राहतील. 15 नोव्हेंबरला रविवारमुळे देशभरातील बँकांचे कामकाज होणार नाही. याशिवाय 16 नोव्हेंबरला सुद्धा देशाच्या अनेक राज्यात बँका बंद राहतील. 16 नोव्हेंबरला भाऊबीज आहे, ज्यामुळे बँका बंद राहतील.

दिवाळीनंतर सुद्धा लागोपाठ दोन दिवस बँका बंद राहतील. या महिन्यात अनेक सण असल्याने बँकांच्या सुट्ट्यासुद्धा जास्त आहेत. 20 आणि 21 नोव्हेंबरला छठपूजेमुळे बिहार आणि झारखंडमध्ये बँका बंद राहतील. तर 22 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व राज्यातील बँकांना सुटी असेल.

28, 29 आणि 30 नोव्हेंबरला बँका बंद
याशिवाय 28 नोव्हेंबरला चौथा शनिवार आहे, ज्यामुळे देशभरातील बँकांचे कामकाज होणार नाही. तर 29 नोव्हेंबरला रविवारी बँका बंद राहतील. यानंतर 30 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमा आहे, या दिवशी सुद्धा बँकांना सुटी असेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे आपली कामे करण्याचा सल्ला दिला आहे.

नोव्हेंबरमध्ये किती दिवस बंद राहतील बँका –
15 नोव्हेंबर – रविवार (सर्व ठिकाणी)
16 नोव्हेंबर – दिवाळी (बलिप्रतिपदा)/लक्ष्मी पूजन/भाऊबीज/चित्रगुप्त जयंती, विक्रम संवत्स न्यू ईयर डे (अहमदाबाद, बेलापुर, बेंगळुरू, गंगटोक, कानपुर, लखनऊ, मुंबई, नागपुर)
17 नोव्हेंबर – लक्ष्मी पूजा/दीपावली/निंगोल चक्कौबा (गंगटोक, इम्फाल)
18 नोव्हेंबर – छठ पूजा (गंगटोक)
20 नोव्हेंबर – छठ पूजा (पाटणा, रांची)
21 नोव्हेंबर – छठ पूजा (पाटणा)
22 नोव्हेंबर – रविवार (सर्व ठिकाणी)
23 नोव्हेंबर – Seng Kutsnem (शिलाँग)
28 नोव्हेंबर – चौथा शनिवार (सर्व ठिकाणी)
29 नोव्हेंबर – रविवार (सर्व ठिकाणी)
30 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिकी पौर्णिमा (आयजवाल, बेलापुर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, देहरादून, हैद्राबाद, जयपुर, जम्मू, कानपुर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, पाटणा, रायपुर, रांची, शिमला, श्रीनगर).