डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बॅंका बंद राहणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्षातला शेवटचा महिना डिसेंबर लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे तब्बल 14 दिवस बॅंका बंद (Bank Holidays December ) राहणार आहेत. या सुट्ट्या संबंधित राज्यांनुसार वेगवेगळ्या आहेत. पुढच्या महिन्यात बँकेच्या कामाचे योग्य नियोजन करा. आणि तारीख बघूनच बँकेत जा ! जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही.

3 डिसेंबरला बँक बंद राहील
डिसेंबर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची सुरुवात 3 तारखेपासून होईल. 3 डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर आहे, ज्यामुळे बँका बंद राहतील. यानंतर 6 तारखेला रविवारी असल्याने बँकांना देशभरात साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर 12 तारखेला डिसेंबर महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर, रविवारी 13 तारखेला साप्ताहिक सुट्टी असेल.

या दिवसही सुट्टी असेल
गोव्यामध्ये 17 डिसेंबरला लॉसोन्ग पर्व, 18 डिसेंबरला डेथ अ‍ॅनिव्हर्सरी यू सो थम आणि 19 डिसेंबरला गोवा मुक्ति दिनची सुट्टी असेल. यानंतर, 20 तारखेला रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी राहणार आहे.

ख्रिसमसची सुट्टी दोन दिवस असेल
डिसेंबरमध्ये ख्रिसमसलाही दोन दिवस सुट्टी असेल. 24 आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असेल. तसेच 26 डिसेंबरला महिन्याचा चौथा शनिवारी असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी असेल आणि 27 डिसेंबर रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल. याचबरोबर, 30 डिसेंबरला यू कीअंग नंगबाह आणि 31 डिसेंबरला इयर्स ईव असल्यामुळे काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.

You might also like