NPR च्या पत्रामुळं होईल बँकेतील ‘हे’ महत्वाचं काम, RBI नं दिली ही खास माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक केवायसीसाठी कागदपत्रांची नवीन यादी जाहीर केली आहे, ज्याच्या मदतीने आपण आपल्या बँक केवायसीचे काम पूर्ण करू शकता. आरबीआयने जारी केलेल्या या यादीमध्ये एनपीआर पत्राला केवायसी पडताळणीसाठी वैध कागदपत्र मानले गेले आहे. एनपीआर प्राधिकरणाच्या वैध पत्राच्या मदतीने आपण केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करू शकता. आपण नवीन अकाउंट उघडण्यासाठी आणि क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे देखील वापरू शकता. आरबीआयने हे देखील स्पष्ट केले की, एनपीआर पत्र अनिवार्य नाही. आपण इतर पत्रांच्या मदतीने केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करू शकता.

या कागदपत्रांच्या मदतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते :
जानेवारीत जारी झालेल्या आरबीआयच्या या नव्या निर्देशानुसार, नो युअर कस्टमर (KYC) साठी वापरल्या जाणार्‍या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड आणि एनपीआर पत्र यांचा समावेश आहे. यापैकी कोणत्याही दस्तऐवजाच्या मदतीने आपण आपल्या बँक खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. आरबीआयने अधिकृतपणे ही कागदपत्रे वैध कागदपत्रे असल्याचे जाहीर केले आहेत.

जाहिरातींमध्ये हा वाद उपस्थित झाला :
भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार क्रमांक, नरेगा अंतर्गत जारी केलेले जॉब कार्ड किंवा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचा उपयोग केवायसी पडताळणीसाठी केले जाऊ शकते. अलीकडेच तेलुगू वृत्तपत्राच्या एका जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे की बँक केवायसी प्रक्रियेसाठी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पत्र सादर करणे बंधनकारक आहे.

व्हिडिओद्वारे देखील व्हेरिफिकेशन :
केंद्रीय बँकेने नुकतीच व्हिडिओ-आधारित ग्राहक ओळख प्रक्रिया जाहीर केली. आरबीआयने केवायसी बँकेसाठी त्याचे नाव ‘V-CIP’ ठेवले आहे. ही एकप्रकारे समोरासमोर पडताळणीची प्रक्रिया असेल, ज्याच्या मदतीने केवायसी व्हेरिफिकेशन केले जाईल.

केवायसी म्हणजे काय
नो युअर कस्टमर अंतर्गत, बँक ग्राहकांकडून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करते, जेणेकरून बँकेच्या कोणत्याही सेवेचा गैरवापर होऊ नये. नवीन बँक खाते उघडण्याच्या वेळी हे केले जाते. वेळोवेळी बँका ही पूर्तता करतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like