Baramati Lok Sabha | ”दुसरीकडे बटन दाबलं तर चैन पडेल का रात्री, आपल्या लेकीला…”, अजित पवारांच्या वहिनींचे सुप्रिया सुळेंसाठी आवाहन

बारामती : Baramati Lok Sabha | अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा जो जाणकार उमेदवार आहे त्याला मत द्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule) कोण आहेत, त्यांचे काम काय, त्यांच्याबरोबर काम करणारी लोक कोण आहेत, हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे त्या लेकीला, माहेरवाशिणीला पुन्हा एकदा संधी द्या, अशी साद अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सख्ख्या वहिनी आणि श्रीनिवास पवारांच्या (Shriniwas Pawar) पत्नी शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी बारामतीकरांना घातली आहे. बारामतीतील उद्धट गावातील प्रचारसभेत त्या बोलत होत्या.(Baramati Lok Sabha)

शर्मिला पवार म्हणाल्या, संसदेत जाऊन बोलावे लागते. समस्या मुद्देसूद मांडाव्या लागतात. चांगले काम करत आहेत त्यांना निवडून आणणे आपले काम आहे. साहेबांनी आपल्याला काही त्रास दिला आहे का. त्यांनी आपल्यावर प्रेमच केले ना इतके वर्षे.

शेवटी काकांवर प्रेमच केले आहे. काही ना काही दिले ना इतके वर्षे. एकही निवडणूक हरलेले नाहीत, आता त्या व्यक्तीला हरवायचे का. ते पाप आपण घडवायचे का. आपल्याला आपले मन, दुसरीकडे बटन दाबले तर चैन पडेल का रात्री. एकदा निर्णय घेतला की घेतला, असे भावनिक आवाहन शर्मिला पवार यांनी केले.

शर्मिला पवार म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे.
परंतु, सुप्रिया सुळे यांनी कधीच पवार नावाचा वापर केला नाही. त्यांना निवडून द्यायचे की नाही हा तुमचा सर्वस्वी अधिकार आहे.

तुम्ही सर्वजण जाणते आहात. आज काय घडत आहे हे प्रत्येकाला माहित आहे.
आज आपण मुखामध्ये श्रीराम म्हणतो. पण, घराघरात काय चालू आहे? असा सवाल शर्मिला पवार यांनी उपस्थित केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Parvati Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

Kangana Ranaut-Mandi Lok Sabha | कंगना रनौतला भाजपकडून उमेदवारी जाहीर, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Mahavikas Aghadi-Shivsena | आज मविआची निर्णायक बैठक, उद्या शिवसेना उमेदवारांची पहिली यादी येणार, जाणून घ्या संभाव्य नावे