Baramati Lok Sabha | बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Lok Sabha | आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच त्यांच्या प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. नणंद-भावजय असा हा बारामतीमधील सामना आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत आपल्या संपत्तीसंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून यातून एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कर्ज आणि उपन्नाची देखील माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचे ५५ लाखांचे कर्ज आहे. तर सुप्रिया सुळे यांचे यंदा शेतीचे उत्पन्न शून्य रुपये असल्याचेही शपथपत्रातील माहितीमधून समोर आले आहे. (Baramati Lok Sabha)

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे आदरणीय पवार साहेब व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीमधील जनतेचे आशीर्वाद आणि भरघोस पाठबळ
यांच्या जोरावर पुन्हा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे.
मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे.
या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची खात्री आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात