Baramati Lok Sabha | सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज, दोन्हीकडून होणार शक्तीप्रदर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळेला पहिल्या दिवसापासून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. येथे पवार विरूद्ध पवार म्हणजेच सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरूद्ध सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) असा सामना होत आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. एकाच कुटुंबातील नणंद आणि भावजयी एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार एकाच दिवशी म्हणजे गुरूवार, १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.(Baramati Lok Sabha)

उमेदवारी अर्ज दाखल करताना हे दोन्ही उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. बारामतीच्या मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) स्वता कंबर कसून रणांगणात उतरले आहेत. भेटीगाठीतून त्यांनी सुरू केलेले बेरजेचे राजकारण यशस्वी होताना दिसत आहे.

सुप्रिया सुळे यांना संसदेतील कामकाजाचा मोठा अनुभव आहे, तसेच निवडणूक लढविण्याचाही त्यांचा अनुभव खुप मोठा आहे. शिवाय देशात ज्यांच्याशिवाय राजकारणाचे पान हलत नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पाठीशी आहेत. सुप्रिया सुळेंसाठी या जमेच्या बाजू आहेत.

तर सुनेत्रा पवार यांना केवळ राजकीय कौटुबिक पाश्र्वभूमी आहे. माहेरी आणि सासरी त्यांनी राजकारण जवळून पाहिले आहे. तर अजित पवारांची ताकद हिच त्यांची जमेची बाजू आहे.

सुनेत्रा पवार १८ एप्रिलला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस
देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार या देखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज
दाखल करणार आहेत.

तर सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
(Balasaheb Thorat), सचिन अहिर (Sachin Ahir) उपस्थित राहणार आहेत.
तसेच खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले (Nana Patole) हे देखील उपस्थित राहू शकतात.
शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल केला जाईल. यानंतर मविआची Mahavikas Aghadi (MVA) पुण्यामध्ये मोठी
प्रचार सभा ११ वाजता होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर साधला निशाणा

Lohegaon Pune Crime | पुणे : प्रेसंबंधाच्या संशयावरुन मारहाण, चारचाकी गाडीची तोडफोड

Bridegroom Suicide In Talegaon Dabhade | पिंपरी : खळबळजनक! लग्नादिवशीच नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल, लग्नमंडपात शोककळा