अमिर खानला पडली ‘बारामती’ ची भुरळ ; ‘या’ कामासाठी तीन-चार दिवस ‘मुक्काम’,जाणून घ्या

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – आमिर खानला बारामतीची भुरळ पडली आहे. यामागील कारण म्हणजे अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातुन पवार कुटुंबियांनी केलेले काम आहे. त्या अनुषंगाने अमीर खानने सांगितले की, गेल्या दोन तीन वर्षांपासुन मला याठिकाणी यायची इच्छा होती. येथे येवुन काहीतरी शिकण्याची मनापासून इच्छा होती कारण बारामती परिसरात करण्यात आलेले काम हा खुप मोठा विषय आहे. त्यासाठी मला येथे तीन चार दिवस मुक्काम करून येथील सर्व परिस्थिती समजून घ्यायची आहे. अशा शब्दांत सिनेअभिनेते अमीर खान यांनी बारामतीबाबत आपले मत स्पष्ट केले.

बारामतीमध्ये कृषक २०२० प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अमीर खान उपस्थित होते. या दरम्यान अमीर खान यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी अमीर खान म्हणाले, मानवाच्या जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पाणी फाउंडेशनतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण, निसर्ग या विषयावर संवाद साधण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. विशेष म्हणजे आज मी येथे शिकण्यासाठी आलो आहे आणि एका दिवसात हे शक्य नसून यासाठी मला तीन चार दिवस मुक्कामी राहून या सगळ्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. असे मत अभिनेता अमीर खान यांनी स्पष्ट केले.

यावेळी अमीर खान म्हणाले, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन गेल्या चार वर्षांपासून आम्ही वॉटर मॅनेजमेंट यावर शिकवत आहोत. गावातील लोकच हे काम करीत आहेत, आम्ही त्यांना केवळ शिकवण्याचे काम करत असतो. तसेच पाण्याच्या नियोजनाबरोबर आम्ही विशेष अशा पाच विषयावर काम करणार आहोत आणि ते विषय म्हणजे जमिनीचे आरोग्य, गवत लागवडक्षेत्र निर्माण करणे, पिक नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि रीफॉरेस्ट्रेशन या विषयांवर पाणी फाउंडेशन काम करणार आहे. असे स्पष्ट करून आमिर खान म्हणाले की, ग्रामीण भागाच्या सर्वच प्रश्नांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्याकडेच ग्रामीण समस्यांचे समाधान असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/