अनेक वर्षांनी संपला ‘बरेली’च्या झुमक्याचा शोध, शेवटी तो मिळालाच…!

बरेली : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्षांपूर्वी आलेल्या मेरा साया चित्रपटातील गाणे झुमका गिरा रे…आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या सुपरहिट गाण्यामुळे बरेली जिल्ह्याचे नाव लोकांच्या मनावर ठसले. या गाण्यात बरेलीच्या ज्या झुमक्याचा शोध घेतला जाता होता, तो शोध आता संपला आहे. बरेलीमध्ये एनएच-24च्या झिरो पॉईंटवर ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात तेथे झुमका चौक बनवण्यात आला आहे. या चौकात एक मोठा झुमका लावण्यात आला आहे. शनिवारी (8 फेब्रुवारी) ला सायंकाळी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी या झुमका चौकाचे लोकार्पण केले. महिलांचे सौंदर्य खुलवणारा झुमका आता बरेलीची शान वाढवत आहे.

बरेली नगरपालिकेने हा झुमका चौक तयार केला आहे, जेथे एक भव्य झुमका लावण्यात आला आहे. मेरा साया चित्रपटातील गाण्याला सिल्व्हर ज्युबली म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाल्याने हा झुमका लावण्यात आला आहे.

नगरपालिकेची ही योजना असून अभिनेत्री साधना यांना श्रद्धांजलीसुद्धा वाहण्यासाठी हा उपक्रम होता, परंतु झुमका लावण्यासाठी येणार्‍या खर्च मोठा असल्याने व बीडीएकडे तेवढा निधी नसल्याने झुमका लावण्यासाठी बरेलीच्या लोकांकडे सहकार्य मागण्यात आले. यानंतर बीडीएने शेवटी झुमका लावला.