Barsu Refinery Project | ‘मुख्यमंत्रीपदावर असताना स्वतःच्या मर्जीने ते काम करू शकले नाहीत, आता…’ उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर भाजपचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बारसू बळजबरीनं (Barsu Refinery Project) लादल्यास महाराष्ट्र पेटवू असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला होता. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.6) रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी ग्रामस्थांशी बोलताना त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) इशारा दिला होता. तसेच धोपश्वर-गिरमादेवी कोंड येथील ग्रामस्थांशी संवाद साधला होता.

 

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुळात हा तेलशुद्धीकरण प्रकल्प बारसूमध्ये (Barsu Refinery Project) व्हावा असं पत्र मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दिले होते, अशी टीका सत्ताधारी नेत्यांनी यापूर्वी केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना, भाजप-शिंदे गटाचे लोक बारसूच्या प्रकल्पासाठी माझ्या नावाचे पत्र नाचवत आहेत, मात्र गद्दारांच्या रेट्यामुळे हे पत्र मी दिलं होतं, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला होता.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, नाणार प्रकल्पाच्यावेळी (Nanar Project) उद्धव ठाकरे म्हणाले होते
की, यासाठी दुसरी पर्यायी जागा देऊ. मग त्यांनीच बारसू प्रकल्पासाठी पत्रं दिली, इथे प्रकल्प व्हावा अशी त्यांचीच सूचना होती.
मात्र ते आता सत्तेतून गेले. आता त्यांना उपरती सुचली आहे. आता ते म्हणतात दुसऱ्यांनी मला सांगितलं म्हणून मी तसं केलं आणि पत्रं दिली.
मुख्यमंत्रीपदावर असताना स्वत:च्या मर्जीने ते काम करु शकत नाहीत तर त्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करु नये,
असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

 

Web Title :- Barsu Refinery Project | BJP leader sudhir mungantiwar slams uddhav thackeray over letter for barsu refinery

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या