Basavwadi Social Foundation | निगडी येथे वचन संशोधन शतमानोत्सवाचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बसववादी सोशल फाउंडेशन (Basavwadi Social Foundation) आणि जागतिक लिंगायत महासभा, पिंपरी चिंचवडतर्फे (Pimpri Chinchwad) वचन पितामह डॉ. फकिरप्पा हळकट्टी यांच्या जयंतीनिमित्त वचन संशोधन शतमानोत्सव तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार 9 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता प्राधिकरण निगडी येथील प्रा. ओझर्डेज् इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न होईल. अशी माहिती फाउंडेशनर्फे (Basavwadi Social Foundation) देण्यात आली.

या कार्यक्रमात दहावीत किमान 85 टक्के गुण व बारावी परीक्षेत किमान 75 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रा. भुषण ओझर्डे सर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक नगरकर यांची उपस्थिती असेल. तसेच उद्योजक अनिल शेटे, पत्रकार दयानंद सोनकांबळे, प्रसन्न शेळके यांची देखील प्रमुख उपस्थिती असेल. अधिक माहितीसाठी 9881602202, 9272183231 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. (Basavwadi Social Foundation)

Web Title :  Basavwadi Social Foundation | Vachana Research Centenary organized at Nigdi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | मित्राचे अपहरण करून लॉजवर डांबून ठेवून खंडणी मागणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

Pune PMC Employees | निवृत्त होतानाच कर्मचार्‍यांना पीएफ, शिल्लक रजेचे पैेसे आणि लगेचच पेन्शन सुरू करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करणार: महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Maharashtra Politics News | शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांना भेटण्यासाठी धरडप, पण…; अमोल कोल्हेंचा मोठा दावा (व्हिडिओ)

Pradeep Deshmukh | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

Alaya F | अभिनेत्री अलाया एफच्या हॉट ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील फोटोने वाढवले इंस्टाग्रामचे तापमान