BCCI | बीसीसीआय लवकरच करणार मोठी घोषणा; ‘या’ खेळाडूंना लागेल लॉटरी तर ‘हे’ खेळाडू होऊ शकतात बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन : टीम इंडियाने (BCCI) नवीन वर्ष 2023 ची सुरुवात दमदार केली आहे. टीम इंडियाने श्रीलंका आणि बलाढ्य न्यूझीलंड संघाचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. या विजयाबरोबरच टीम इंडियाने एकदिवसीय मालिका आणि टी20 मालिकेत आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या वर्षीचा एकदिवसीय वर्ल्ड कप भारतात होणार आहे. त्यामुळे हे मालिका विजय भारतासाठी मनोबल वाढवणारे आहेत. आता टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे लवकरच बीसीसीआय लवकरच मोठी घोषणा करणार आहे. (BCCI)

हे खेळाडू होणार मालामाल
बीसीसीआय लवकरच खेळाडूंच्या कराराची घोषणा करणार आहे. याअंतर्गत टीम इंडियाचे काही खेळाडू मालामाल होणार आहेत. या करारामध्ये टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या, मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव आणि युवा फलंदाज शुभमन गिल हे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून ते मालामाल होण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या सध्या ‘बी’ ग्रेडमध्ये आहे. गेल्या काही मालिकेतील त्याची कामगिरी पाहता हार्दिक पांड्याची ए ग्रेडमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवचाही ए ग्रेडमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच भारताचा युवा ओपनर फलंदाज शुभमन गिलचाही ए ग्रेडमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. बी ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये तर ए ग्रेडमधल्या खेळाडूंना दरवर्षी 5 कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतात. (BCCI)

या खेळाडूंना फटका बसण्याची शक्यता
यादरम्यान काही खेळाडूंना या कराराचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा खेळाडूंच्या करार यादीतून बाहेर होऊ शकतात. हे दोन खेळाडू बऱ्याच काळापासून टीम इंडियापासून दूर आहेत. याशिवाय टीम इंडियाचा विकेटकिपर ऋधीमान साहादेखील या यादीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तोदेखील मागच्या एक वर्षांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे.

Web Title :- BCCI | bcci soon annouce new annual central contracts hardik pandya suryakumar yadav shubman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल

Kangana Ranaut | सिद्धार्थ-कियाराच्या विवाह सोहळ्यापूर्वी कंगना रणौतने त्यांच्यासाठी लिहिली ‘हि’ खास पोस्ट

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस