IPL च्या 13 व्या सीझनमधून BCCI नं कमावले हजारो कोटी रूपये, MI Vs CSK च्या सामन्यात झाली कमाल

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीमध्ये बीसीसीआय आयपीएलच्या 13व्या सीझनचे आयोजन करण्यात यशस्वी ठरली. या सीझनमध्ये बीसीसीआयला चार हजार कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. इतके नव्हे, मागच्या वर्षीच्या तुलनेत आयपीएल टीव्हीवर पहाणार्‍या प्रेक्षकांच्या संख्येत 25 टक्केची वाढ झाली.

कोविड 19 चा धोका असताना खेळाडू आणि स्टाफला सुरक्षित ठेवणे सोपे नव्हते. यासाठी बीसीसीआयने 1800 लोकांच्या 30 हजार आरटी पीसीआर टेस्ट केल्या. 60 दिवसापर्यंत चाललेल्या या टूर्नामेंटमध्ये कोरोना व्हायरसचे एक सुद्धा प्रकरण समोर आले नाही.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धूमल यांनी आयपीएल 13 च्या यशाचे रिपोर्ट कार्ड शेयर केले आहे. या वर्षी फेब्रुवारीपासून जगात कोरोना व्हायरसचा कहर वाढण्यास सुरूवात झाली होती आणि मागील 6 महिन्यात आयपीएल पहिली अशी टूर्नामेंट होती, जिचे आयोजन इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते.

स्टार सोबतच्या डिलमधून झाला फायदा
मात्र, बीसीसीआयने आयपीएलमूधन झालेल्या कमाईची जास्त माहिती दिलेली नाही. परंतु यशस्वी आयोजनासह बोर्ड स्टारसोबत झालेल्या पाच वर्षांची ब्रॉडकास्ट डिल वाचवण्यात यशस्वी झाले. स्टारने बीसीसीआयला पाच वर्षासाठी 16,347 कोटी रूपये दिले आहेत.

धूमल यांनी म्हटले, बोर्ड मागच्या वर्षातील खर्चात 35 टक्केची कपात करण्यात यशस्वी झाले होते. यावर्षी आयपीएलमधून चार हजार कोटी रूपये मिळाले आहेत आणि टीव्हीवर सुद्धा 25 टक्के प्रेक्षकांची वाढ झाली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या ओपनिंग मॅचचा टीआरपी सर्वात जास्त होता. बीसीसीआयला या आयपीएलसाठी यूएईसह श्रीलंकेकडून सुद्धा ऑफर मिळाली होती. यूएईकडे अगोदरचा अनुभव असल्याने बोर्डाने त्यांची निवड करणे योग्य समजले.