IPL मध्ये ‘पावर प्लेयर’ आणण्याचा विचार, मॅच दरम्यान खेळाडू बदलणार, वाढणार ‘रोमांच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) जगभरातील सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बोर्ड लीगमध्ये ‘पॉवर प्लेयर’चा नियम आणण्याचा विचार करत आहे. या नियमानुसार संघ सामन्या दरम्यान कधीही विकेट गेल्यानंतर किंवा ओवर संपल्यानंतर खेळाडू बदलू शकतात.

बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकाऱ्याने सांगितले की या नियमाला मंजुरी तर मिळाली आहे, परंतू यावर मंगळवारी मुंबईस्थित बीसीसीआयच्या मुख्यालयात होणाऱ्या आयपीएल गवर्निंग कौन्सिलच्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात येईल.

अंतिम 11 च्या जागी 15 खेळाडू खेळवण्याचा प्लॅन
अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही असा विचार करत आहे जेथे संघात अंतिम 11 च्या जागी 15 खेळाडू निवडण्याची आणि एक खेळाडू सामन्या दरम्यान कधीही विकेट गेल्यानंतर किंवा ओवरनंतर बदलता येईल. आम्ही हे आयपीएलमध्ये आणण्याचा विचार करत आहोत, परंतू पुढील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हे नियमांना लागू करणे योग्य ठरेल.

अधिकाऱ्यांने सांगितले की यामुळे सामन्यात बदल होऊ शकतो आणि दोन संघांसाठी काही तरी वेगळा विचार करणे हे रणनीति तयार करण्याला प्रोस्ताहन देईल.

यामुळे होऊ शकतात हे बदल
अधिकारी म्हणाले की, विचार करा की तुम्हाला 6 चेंडूत 20 धावा हव्या आहेत आणि आंद्रेल रसेल बाहेर आहे, कारण तो पूर्णत: फिट नाहीत आणि अंतिम 11 मध्ये नाहीत. परंतू या नियमानंतर ते मैदानात त्याही परिस्थिती उतरु शकतील आणि खेळू शकतील.

ते म्हणाले की, अशा प्रकारे शेवटच्या ओवरमध्ये 6 धावा हव्या आहेत आणि जसप्रीत बुमराह सारखा खेळाडू डग आऊटमध्ये बसला आहे, तर कर्णधार काय करेल. तो बुमराहला 19 व्या ओवरनंतर मैदानात उतरवेल. या नियमाने मॅच बदलण्याचा दम आहे. आयपीएलच्या गवर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या नियमाव्यतिरिक्त सदस्य 2019 आयपीएलची वर चर्चा करेल. तसेच यावर देखील चर्च होईल की पुढील सीजनला लोकप्रिय कसे बनवता येईल.

Visit : Policenama.com