Beed Crime | हॅकरनं थेट SP चा फोटो वापरून अनेकांकडे केली पैशाची मागणी; पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आव्हान, म्हणाले…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | नागरिकांना गंडा घालण्यासाठी सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. मात्र आता हॅकर्सने थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे बीडमध्ये (Beed Crime) समोर आले आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (SP Nand Kumar Thakur) यांच्या नावाने पैसे मागितल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी (दि.19) त्यांचा फोटो व्हॉट्सॲप डीपीला ठेवून पैशांची मागणी (Demand Money) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

सायबर गुन्हेगाराने थेट पोलीस अधीक्षकांनाच आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे फेसबुकवर वैयक्तीक अकाउंट आहे. त्यांनी ते लॉक केलेले आहे. परंतु मित्रयादीतील काही जणांना मेसेंजरमधून पैशांची मागणी झाली. त्यानंतर व्हॉट्सॲपवर ठाकूर यांचा फोटो डीपीला ठेवून व्हाऊचर पाठवून पैसे मागितले. (Beed Crime)

 

अधीक्षकांनी पैसे मागितल्याचे पाहून काहीजण गडबडून गेले. मात्र, मित्र यादीमधील अधिकाऱ्यांनी अधीक्षकांना संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली. ठाकूर यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माझ्या फोटोचा वापर करुन कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नये, दुर्लक्ष करावे, अशी सूचना दिली. दरम्यान, सायबर भामट्यांनी पोलीस अधीक्षकांच्या फोटोच्या आधारे तेच असल्याचे भासवून पैसे मागितल्याने सायबर विभागाने प्राथमिक तपास सुरु केला आहे. यामध्ये संबंधित आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल होण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, माझा फोटो व्हॉट्सॲप डीपीला ठेऊन
तसेच फेसबुकवर मित्र यादीतील काहींना मेसेंजरमधून संदेश पाठवून पैशांची मागणी केल्याचे कळाले.
त्यानंतर फेसबुकवर पोस्ट करुन सूचना लिहिलेली आहे. अद्याप कोणीही पैसे पाठवलेले नाहीत.
संबंधिताचा शोध घेतला जाईल. कोणीही अशा भूलथापांना बळी पडू नका.

 

Web Title :- Beed Crime | hackers direct challenge to police demanded money using sps photo on whatsapp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा