Beed Crime News | राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा मद्यपान करुन जिल्हा परिषदेत धिंगाणा; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले निलंबित

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | राष्ट्रपती पुरस्कार (President’s Award) प्राप्त शिक्षकाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मद्यपान करुन गोंधळ घातला. माझे काम केले नाही तर इमारतीवरुन उडी मारीन, अशी धमकी देऊन एकच धिंगाणा घातला. या शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. (Beed Crime News)

शिक्षक विजय कुंडलिक आमटे (Teacher Vijay Kundlik Amte) असे या शिक्षकाचे नाव आहे.
सध्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव केंद्रांचा प्रभारी पदभार त्यांच्याकडे आहे.
त्यांच्या पदोन्नतीचे प्रकरण जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात प्रलंबित आहे.
पदोन्नतीच्या अनुषंगाने ते ५ जानेवारीला जिल्हा परिषदेत आले होते.
त्यांनी सकाळी शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते दुपारी पुन्हा शिक्षण विभागात आले.
पदोन्नतीबाबतची संचिका तत्काळ प्रस्तावित का करत नाहीत? अशी विचारणा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
माझे काम लवकर करा, नाही तर मी इमारतीवरुन उडी मारीन अशा शब्दात त्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना धमकाविण्यास सुरुवात केली. मद्यपान करुन त्यांनी कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली़ कर्मचार्‍यांनी याची तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली.

शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन तक्रार मांडली.
त्याची पाठक यांनी गांभीर्याने दखल घेत शिक्षक विजयकुमार आमटे यांना गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

अल्पवयीन मुलींकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी एकाला अटक, येरवडा परिसरातील घटना

Pune News | कात्रज डेअरीच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण!, ‘राजकिय व प्रशासकिय’ व्यवस्थेने घातलेल्या घोळात दुध संघ व स्थानीक नागरिक वेठीस!

Fursungi Devachi Uruli Garbage Depot | फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शुटिंग; अक्षय कुमार, सारा अली खानच्या ‘स्कायफोर्स’च्या शूटिंगसाठी मागणी

दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे साडे तेरा लाख हडपले, हडपसर मधील प्रकार

वाईन शॉपमधून विदेशी दारूसह रोकड लंपास, दापोडी मधील घटना