Beed News | व्हॉट्सअॅवर ‘आय एम सॉरी’ स्टेटस ठेवून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याने उचललं टोकाचं पाऊल

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Beed News | बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या घाटनंदुर (Beed Crime) गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. खासगी शिकवणी (Private Tuition) घेणाऱ्या एका तरुण शिक्षकाने व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर ‘आय एम सॉरी’ ( I Am Sorry) असे स्टेटस (Status) ठेवून आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या (Beed News) करणारा हा तरुण घाटनांदुर गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

नितेश कोकणे (Nitesh Konkane) असे आत्महत्या केलेल्या तरुण शिक्षकाचे नाव आहे. कोकणे यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून राहत्या घरी गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली. नितेश कोकणे हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Elections) निवडून आले आहेत. ते खासगी संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही. (Beed News)

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलीस ठाण्यातील (Ambajogai Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
उच्च शिक्षित असलेल्या नितेश कोकणे यांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

 

Web Title :- Beed News | teacher taking private tuition commits suicide by posting i am sorry status on whatsapp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा