मंचर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा बीड पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मंचर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एकास बीडच्या उपविभागीय तपासी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई बीड बसस्थानकावर करण्यात आली असून आरोपीविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. बीड पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह पकडण्यात आलेल्या तरुणाला मंचर पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

बीड उपविभागीय तपासी पथकाचे कर्मचारी शेख सलिम, तांबरे, राऊत, विकास उजगरे आणि जगताप हे मध्यरात्री एकच्या सुमारास बीड बसस्थानकाची तपासणी करत होते. त्यावेळी एक तरुण आणि एक अल्पवयीन मुलगी संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांच्या बोलण्यात भिन्नता जाणवल्याने त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने तिचे खरे नाव आणि पत्ता सांगितला. पोलिसांनी मंचर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता प्रविण नंदू वरे याच्या विरोधात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मंचर पोलीसांनी दिली. बीड पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांकडे संपर्क साधून त्यांना बीड येथे बोलावून घेत मुलीचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला. तर आरोपी प्रविण वरे याला मंचर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

जायचे होते औरंगाबादला पण सापडला बीडमध्ये
मंचर येथून मुलीचे अपरहरण केल्यानंतर प्रविण वरे याने वेगवेगळ्या बसने बीड गाठले. रात्री उशिरा जामखेड-बीड या गाडीने तो एक वाजता बसस्थानकात उतरला. दरम्यान त्याने एका व्यक्तीशी सतत संपर्कात होता. बीडवरून तो औरंगाबादला जाणार होता. मात्र, बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो पोलीसांच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख सलीम, तांबारे, राऊत, विकास उजगरे आणि जगताप यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सावधान ! सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ आजार

जाणून घ्या : ‘कडुलिंबाच्या’ पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे

स्किनच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्वरित परिणाम देणारी ‘कॉफी’

‘डिमेन्शिया’ रुग्णांची काळजी कशी घ्यावी