पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना ‘फिक्की’चा राष्ट्रीय पुरस्कार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इडस्ट्रीजच्या (फिक्की) वतीने ‘बेस्ट कम्युनिटी पोलिसिंग’ या गटासाठी दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते हर्ष पोद्दार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फिक्कीच्या वतीने भारतीय नागरिकांची सुरक्षा व सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी विवध पुरस्कार प्रदान केले जातात. त्यामध्ये देशांतर्गत सुरक्षा या विषयाशी संबंधित केंद्रीय सशस्त्र दल, सुरक्षा संस्था, पोलीस प्रशासन यांना विशेष कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरविले जाते. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी औरंगाबाद, कोल्हापूर, मालेगाव, नागपूर येथे कम्युनिटी पोलिसिंगसाठी विशेष प्रयत्न केले होते.

हर्ष पोद्दार यांनी हजारो विद्यार्थ्यांना गुन्हेगारी आणि दहशतवादी मार्गावरून परावृत्त केले आहे. त्यासाठी त्यांनी विशेष शिबीरे राबविली होती. तसेच मालेगाव येथे फेक न्यूज विरोधातील त्यांनी राबविलेली विशेष मोहीम गाजली होती. या दोन्ही कार्याची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना देण्यात आला. तसेच देशातील सर्व राज्यातून उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार महाराष्ट्र पोलिसांना मिळाला आहे. हर्ष पोद्दार यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –