बीडः वाळूमाफियांकडून तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

गेवराईः पोलीसनामा आॅनलाईन

अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सेलू तांडा ते गेवराई रोडवर घडली आहे. बंडू घाटुळे असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल वसंतराव आमलेकर (वय-31, तलाठी सज्जा जातेगाव)  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तलाठी विठ्ठल आमलेकर हे आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना, सेलू तांडा ते गेवराई माजलगाव रोडवर दोन ट्रॅक्टर वाळू वाहतूक करत असताना दिसून आले. दोन्ही ट्रॅक्टर तपासणीसाठी थांबविले असता ट्रॅक्टरला नंबर नसल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी एक ट्रॅक्टर चालक ट्राॅली सोडून गेला तर दुसरा थांबला. त्याच्याकडे वाळूची वाहतूक करण्याचा परवान्याची विचारणा केली तेव्हा तो नसल्याचे सांगितले. पुढील कारवाईसाठी ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले असता, चालकाने (अशोक जगताप) हे ट्रॅक्टर बंडू घाटुळे व किरण दाद यांच्या मालकीचे असून, मी तहसिल कार्यालयाला नेणार नाही असे म्हटले. यावेळी चालकाने तलाठ्यावर दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला.

[amazon_link asins=’B07DMZZQ2M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f631cde6-7c5a-11e8-80b2-ef240fe40b71′]

यानंतर चालकाने घटनास्थळावरुन जाऊन सदर घटनेची माहिती आपल्या मालकाला दिली. काही वेळातच मालक बंडू घाटुळे त्या ठिकाणी आला व तलाठ्याला शिवीगाळ करु लागला. मी या ठिकाणचा कार्यकर्ता आहे. तु माझं काहीच वाकडं करु शकत नाही. एवढेच नाहीतर मी तुझी नोकरी घालवतो असे म्हणत तलाठ्याच्या मारहाण करुन दोन्ही ट्रॅक्टर घेऊन गेले. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.