वाकडमध्ये अमृत योजनेअंतर्गत HDPE पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन
वाकड मधील दक्षता नगर कस्पटेवस्ती येथे पाणीपुरवठा विभागातर्फे अमृत योजने अंतर्गत १६० मी.मी. व्यासाचे HDPE पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06d44eff-cd68-11e8-8a48-1155f61477d2′]

याप्रसंगी या परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या. अनेक दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या होती.येथील पाईपलाईन जुनी असल्या कारणाने या ठिकाणी पाणी कमी दाबाने येत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या येथील नागरिकांना भेडसावत होती.

[amazon_link asins=’B0789L817Q,B01A8HUZ9A,B01JCYRRCI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b06bf83-cd68-11e8-8725-b725a0decd90′]

येथील सर्व नागरिकांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्याकडे या संदर्भात तक्रार मांडली होती. त्यावर त्यांनी या पाणीपुरवठा विभागाशी योग्य तो पाठपुरावा करून येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा व जोपर्यंत येथील पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश संबंधित पाणीपुरवठा विभागास दिले. गेले काही दिवस या परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू होता.

आज अमृत योजने अंतर्गत १६० मी.मी. व्यासाचे HDPE पाईप टाकून या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साबळे, कनिष्ठ अभियंता सचिन कुतवळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.