माझा ‘चमकोगिरी’ पेक्षा कामावर विश्‍वास : आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

माझा ‘चमकोगिरी’ पेक्षा कामावर विश्‍वास आहे. कर्तव्य बजाविताना पोलिसांना धक्‍काबुक्‍की करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकारचे खटले न्यायालयात जलदगतीने चालवून संबंधित आरोपींना शिक्षा कशी हाईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील वाहतूक समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यांच्यासाठी तज्ज्ञांकडून पोलिसांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचे वेंकटेशम यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6eb17113-a78d-11e8-a560-1f938169e89c’]

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांचा वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वार्तालापास पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सार्वमतचे ब्युरो चीफ राजेंद्र पाटील, सरचिटणीस आणि दै. पुढारीचे सिनीअर रिपोर्टर पांडुरंग सांडभोर, खजिनदार आणि दै. सामनाचे क्राईम रिपार्टर ब्रीजमोहन पाटील, कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र टाईम्सचे सिनीअर रिपार्टर प्रशांत आहेर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी वेंकटेशम म्हणाले, शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे आणि रस्त्यावर बंद पडणार्‍या पीएमपी बसमुळे वाहतूकीची कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. मनपा आयुक्‍त सौरभ राव यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच मनपा आणि पोलिसांची एक बैठक आयोजित केली जाणार आहे. शहरात गंभीर स्वरूपाचे अपघात देखील घडत आहेत. त्याची आकडेवारी मी पाहिली आहे. वाहतूकीची समस्या सोडविण्यास प्रामुख्याने प्राधान्य दिले जाणार आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75a53aed-a78d-11e8-adaf-5fff340e047a’]

वाहतूकीची नियमन करताना पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांशी अरेरावीची भाषा केली जाते तर काही वेळा त्यांच्याशी धक्‍काबुक्‍की करण्यात येते. कर्तव्य बजाविणार्‍या पोलिसांशी धक्‍काबुक्‍की करणार्‍यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे खटले न्यायालयात जलदगतीने चालविण्यात येणार आहेत आणि संबंधित आरोपींना शिक्षा कशी होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

सायबर आणि आर्थिक गुन्हयांचे प्रमाण वाढत आहेत. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्‍ला झाल्यानंतर सायबर गुन्हे शाखेतील कर्मचार्‍यांना अद्यावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सायबर गुन्हे करणारे वेगवेगळया आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. पोलिसांनी एक पाऊल पुढे असणे आवश्यक आहे.

शहरात अनेक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भाडेकरू नोंदणी तसेच लॉस्ट अँड फाऊंड पोर्टल अद्यावत करण्यात येणार आहे. रस्त्यावर अधिक प्रमाणात पोलिस दिसल्यास गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांना आळा घालणे शक्य होईल. पोलिसांचे चांगले काम समाजासमोर येणे आवश्यक आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7aff9f26-a78d-11e8-846d-9bbc3090e41c’]

नागरिकांचे हित विचारात घेवुन काम केले जाणार असल्याचे डॉ. के. वेंकटेशम यांनी नमूद केले आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी वार्तालापा दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना उत्‍तरे देवून प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लवलकरात लवकर दूर करण्यात येईल असे सांगितले. ‘चमकोगिरी’ पेक्षा माझा कामावर अधिक विश्‍वास असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले.