Belly Fat | या 3 फळांचे रोज करा सेवन, पोटाच्या चरबीपासून होईल सुटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Belly Fat | बरेच लोक वजन कमी (weight loss) करण्यासाठी कमी अन्न खातात किंवा उपाशी राहून जलद वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे तुम्ही वजन कमी करू शकता, परंतु कमी खाणे किंवा उपाशी राहण्याने आरोग्य बिघडू शकते. योग्य आहार न घेतल्याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत, ज्यामुळे शरीर कमजोर होऊ शकते. एवढेच नाही तर शरीराची हाडेही कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे जर पोटाची चरबी कमी (Belly Fat) करायची असेल तर आहारात काही फळांचा समावेश करू शकता. यासाठी आहारात कोणती फळे समाविष्ट करावीत ते जाणून घेवूया…

 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा ही फळे

1. किवी (Kiwi) –
वजन कमी करण्यासाठी किवी हे एक फळ आहे. कारण किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फायबर (Vitamin C, Vitamin E, Folate, Fiber) भरपूर प्रमाणात असते. एवढेच नाही तर किवीच्या बिया पचनास मदत करतात. त्याच वेळी, किवीच्या हिरव्या भागामध्ये विद्रव्य फायबर आढळते. ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. दुसरीकडे, जर गोड खावेसे वाटत असेल तर किवीचे सेवन करू शकता.

2. सफरचंद (Apple) –
सफरचंद पोटाची चरबी कमी (Belly Fat) करण्यात मदत करू शकते. कारण सफरचंदात भरपूर फायबर असते
ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी होते. याशिवाय रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजारांपासून दूर राहू शकता.

 

3. पपई (Papaya) –
पपईचे सेवन केल्याने वजन आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात
जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.

 

Web Title :- Belly Fat | weight loss tips by doing these fruits daily you will get rid of belly fat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Food | पाण्यात भिजवून खा हे Dry Fruit, कंट्रोलमध्ये राहिल तुमचे वजन

 

Diabetes Symptoms | शरीराचा हा भाग पिवळा होऊ लागला असेल तर व्हा अलर्ट, डायबिटीजचा इशारा तर नाही ना?

 

How to Prevent Cold and Fever | पावसाळ्यात वेगाने पसरत आहे सर्दी-तापाची साथ, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावाची पद्धत