Benefits Of Lemon Water | उकडलेल्या लिंबाचे पाणी प्यायल्याने वजन होईल कमी, होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे; जाणून घ्या कृती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Lemon Water | लिंबू (Lemon) हे एक असे फळ आहे, जे चव वाढवते, शिवाय अन्न पचवणे आणि उष्णतेपासून आराम देण्यास मदत करते. उन्हाळ्यात लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या ऋतूमध्ये तुम्ही तुमच्या आहारात लिंबूपाणीचा समावेश करून अनेक आजार टाळू शकता (Benefits Of Lemon Water). पण तुम्हाला माहित आहे का की उकळलेले लिंबू पाणी अनेक आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरू शकते (Know Here Benefits Of Boiled Lemon Water).

 

लिंबू अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. लिंबू हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी (Vitamin A And Vitamin C) तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि फोलेटने समृद्ध आहे. हेल्थलाइनच्या मते, वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आणि किडनी स्टोन (Kidney Stone) दूर करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे. त्याचे फायदे जाणून घेऊया (Benefits Of Lemon Water)…

 

असे तयार करा लिंबूपाणी ड्रिंक (Make Lemonade Drink Like This)

एका भांड्यात एक ग्लास पाणी घेऊन त्यात अर्धे लिंबू टाकून उकळवा.

साधारण पाच मिनिटे उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवा.

कोमट झाल्यावर त्यात मीठ किंवा मधही घालू शकता.

लिंबाचा रस पिळून घेतल्यानंतर त्याची साल उकळून पिऊ शकता.

या पेयाने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता.

उकडलेल्या लिंबूपाण्याचे फायदे (Benefits Of Drinking Boiled lemonade)

1. लिंबूमध्ये असलेले कॅल्शियम आणि पोटॅशियम उच्च रक्तदाब सामान्य पातळीवर आणण्यासाठी उपयुक्त आहे. काळ्या चहामध्ये लिंबाचा रस मिसळून सेवन करू शकता.

2. लिंबू त्वचेसाठी फायदेशीर आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने, उकळलेले लिंबू पाणी अँटी-ऑक्सिडंट म्हणून कार्य करते, ज्यामुळे त्वचेतील मुक्त रॅडिकल्स कमी होतात आणि ती चमकदार होते.

3. लिंबू पाणी उकळून प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

4. विषाणूजन्य संसर्गासारख्या आजारांशी लढण्यासाठी प्रभावी आहे.

5. उकडलेले लिंबूपाणी मधात मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होऊ लागते.

6. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहते.

7. लिंबू पाणी उकळून प्यायल्याने पोट चांगले राहते. बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी अशा अनेक समस्या दूर होतात.

 

ही काळजी घ्या (Take Care Of This)
हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार लिंबाचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेवर अ‍ॅलर्जी आणि खाज येऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Lemon Water | benefits of lemon water know here benefits of boiled lemon water

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pankaja Munde | ‘लवकरच समजेल..’! विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

 

Pune Crime | पुण्यात महिला पोलिसांचे केस ओढून केली धक्काबुक्की

 

Aadhaar Security Tips | आधार कार्ड शेयर किंवा वापरताना अवलंबा ‘या’ 8 सिक्युरिटी टिप्स, सरकारने दिली माहिती