97 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंञी कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळणार – डॉ.सुभाष भामरे

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन –  प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामध्ये धुळे जिल्ह्यातील 678 गावांपैकी 590 गावांतील शेतकऱ्यांचा डाटा हा ऑनलाईन प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आला असून यातील 97 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती संकलीत करण्यात आली असून कृषी सन्मान योजनेच्या 6 हजाराच्या अनुदानापैकी पहिला हप्ता रुपये प्रत्येकी दोन हजार जमा करण्यात येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील आठ दिवसांत पहिल्या हप्त्याचे अनुदान जमा करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी सन्मान योजनेचे गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी महाविद्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, कृषी विस्तार केंद्राचे एम. एस. महाजन, कृषी महाविद्यालयाचे डॉ. सी. व्ही. पुजारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, डॉ. पंकज पाटील, डॉ. जगदिश काथेपुरी उपस्थित होते. सुरवातीला पुलवामा (जम्मू- काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ.भामरे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या अंमलबजावणीस