सुख, सौभाग्य, दिर्घ आयुष्यमानासाठी करा देवगुरु ‘बृहस्पति’ची पूजा, उजळेल तुमचं ‘भाग्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिषनुसार देवतांचे गुरु बृहस्पति शुभ देवता आणि ग्रह मानले जातात. ज्याच्या प्रभावाने व्यक्तिला सुख, सौभाग्य, दिर्घ आयुष्यमान, धर्म लाभ इत्यादी प्राप्त होते. खरंतर देवगुरु बृहस्पति शुभ फळ प्रदान करतात, परंतू हे पत्रिकेत कोणत्यातरी पापी गृहासोबत बसले असतील तर कधीकधी अशुुभ संकेत देखील देऊ लागतात. बृहस्पतिच्या अशुभ झाल्याने व्यक्तीच्या विवाहाला विलंब होतो. यामुळे शिक्षणात देखील बाधा येऊ शकते, मान सन्मानाची हानी होते. रोजगारावर संकट येते. अशात बृहस्पतिची कृपा मिळवण्यासाठी आणि दोष दूर करण्यासाठी खालील उपाय करावे.

१. धार्मिक मान्यतेनुसार बृहस्पति देवतेला पिवळा रंग आधिक पसंत आहे. याच कारणाने त्यांच्या पूजेत हळदीचा प्रयोग केला जातो. बृहस्पतिची कृपा व्हावी म्हणून केळाच्या झाडाचे मूळ किंवा हळदी पिवळ्या वस्त्रात गळ्यात बांधावे किंवा दंडात बांधावे.

२. देवगुरुला प्रसन्न करण्यासाठी बृहस्पतीच्या दिवशी डाळ, हळद, पिवळे वस्त्र, बेसनचे लाडू इत्यादी ब्राम्हणाला दान करावे आणि केळाच्या झाडाला पाणी घालावे.

३. प्रत्येक दिवशी भगवान विष्णुची पूजा करा. कोणत्याही शुभ कार्यांची सुरुवात करताना हे केल्यास यश नक्की मिळेल.

४. बृहस्पतिला प्रसन्न करण्यासाठी दररोज ‘ऊँ भगवते वासुदेवाय नम:’ मंत्र म्हणत माळ जपा. तसेच शक्य असल्यास पिवळ्या रंगाचा प्रसादाचा नेवैद्य दाखवून, प्रसाद वाटा.

५. विविध प्रकारचे आर्थिक कष्ट दूर करण्यासाठी, भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी बृहस्पतिवरला विशेष रुपातील विष्णुसहस्रनामाचा पाठाचे पठन करावे.

६. गुरुवारी भगवानाच्या पुजेनंतर केसरचा टिळा लावा, जर केसर उपलब्ध नसेल तर हळदीचा टिळा लावू शकतात.

७. गुरुवारी भगवान बृहस्पतिचा आशिर्वाद घ्यावा आणि त्यांना पिवळा रंगाचे वस्त्र उपहारात द्यावे, गुरुचा आशिर्वादाने तुम्हाला गुरु ग्रह शुभ फळ देईल.