भद्रावती : सफाई कामगारांतर्फे आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार

भद्रावती- येथील नगर परिषदेच्या सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल येथील आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

येथील नगर परिषदेत कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार कामावर आहेत.हे कामगार तुटपुंज्या पगारावर काम करीत होते.तसेच त्यांना योग्य सुविधा पुरविल्या जात नव्हत्या.काही कामगारांना कोरोना काळात कामावरुन काढून टाकण्यात आले होते. याबाबत येथील आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना भेटून व निवेदन सादर करुन सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.ही मागणी पूर्ण झाल्याने आम आदमी पार्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील पंचशील वार्डात एका छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या कृतज्ञतापूर्ण सत्कार सोहळ्यात आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा संघटनमंत्री परमजितसिंग झगडे, जिल्हा मिडिया प्रभारी राजेश चेडगुलवार, महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे,तालुका प्रमुख सोनल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व सफाई कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते.