Bhagat Singh Koshyari | पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे परखड मत, म्हणाले- ‘दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. पहाटेच्या शपथविधी बाबत शरद पवार (Sharad Pawar) यांना माहिती होती, त्यांच्या परवानगीनेच शपथविधी झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. यानंतर पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर आता फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना शपथ देणारे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी यावर परखड मत व्यक्त केलं आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी केलेल्या खटाटोपावर कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमच्याकडे एका मोठ्या पक्षाचे नेते आले होते. त्यांच्यासोबत दुसरे नेतेही आले आणि त्यांनी आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं मग आम्ही राष्ट्रपती राजवट (President’s Rule) का उठवू नको? राजकारणात एका क्षणात गोष्टी बदलतात मग एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवली तर त्यात नवल काय? असं भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राज्यपाल शपथविधीसाठी बोलवत नाहीत

भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीवर (Swearing in) बोलताना म्हणाले, दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्या असलेले पत्र दाखवलं. त्यानंतर शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आले त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात ते बोलवत असतात. मी ज्यांना शपथ दिली त्यांनी याबाबतचं सत्य सांगितले असल्याचे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले.

त्यावर शरद पवारांना दहा वेळा विचार करावा लागेल

Advt.

पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती होती का? असा प्रश्न कोश्यारी यांना विचारण्यात आला.
यावर बोलताना ते म्हणाले, शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता जर आणि तर ची भाषा महाराष्ट्राच्या राजकीय
परिस्थितीसंदर्भात करत असेल तर उच्च न्यायालयात (High Court) त्यांचं जे लवासा प्रकरण (Lavasa Case)
आहे त्यावर त्यांना दहा वेळा विचार करावा लागेल. शरद पवारांचा मी खूप आदर करतो.
माझ्या हस्ते त्यांना दोन वेळा डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
तरीही ते असं म्हणत असतील तर ते राजकीय बोलत आहेत, असे परखड मत कोश्यारी यांनी व्यक्त केले.

Web Title :- Bhagat Singh Koshyari | ajit pawar came to me by himself bhagatsinh koshyaris expos regarding early morning swearing in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहताच चाहतीने केले ‘हे’ कृत्य; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Politics | पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यावर विधीमंडळातील पक्ष कार्यालयही गेलं, शिंदे गटाने घेतला पक्ष कार्यालयाचा ताबा; ठाकरे गटाच्या आमदारांचे काय?