Bhandara on Radhakrishna Vikhe Patil | विखे-पाटलांवर भंडारा उधळणाऱ्या आंदोलकांना पडळकरांनी फटकारले, म्हणाले – ‘हा मल्हारी मार्तंडचा भंडारा…’ (Video)

Gopichand Padalkar

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bhandara on Radhakrishna Vikhe Patil | राज्याचे महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा टाकण्याचा प्रकार आज सोलापूरमध्ये घडला. यामुळे विखे-पाटील यांच्याजवळ उभ्या असलेल्या सुरक्षारक्षांनी व कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर धनगर समाजाचे नेते (Dhangar Community Leader) आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी आंदोलक तरुणांना फटकारले आहे. (Bhandara on Radhakrishna Vikhe Patil)

काही लोकांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळला (Bhandara on Radhakrishna Vikhe Patil), मी विखे पाटील यांना विनंती करतो की तो खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा आशीर्वाद समजून कपाळाला लावावा, मात्र, या भंडाऱ्याचा उपयोग आंदोलनासाठी (Agitation) करणे हे अतिशय अयोग्य असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. (Bhandara on Radhakrishna Vikhe Patil)

पडळकर नेमकं काय म्हणाले?

मल्हारी मार्तंडचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करणे हे अतिशय अयोग्य आहे. काही लोकांनी भंडारा मंत्री विखे पाटील यांच्यावर उधळला असेल, तर मी विखे पाटील यांना विनंती करतो की तो खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा आशीर्वाद समजून कपाळाला लावा. तसेच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो ही ह्या ‘लांडगा काका’च्या नादी लागू नका, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

पडळकर पुढे म्हणाले, आपण धनगर आरक्षणाची (Dhangar Reservation)
लढाई कायद्याच्या मार्गाने लढत आहोत. ही लढाई मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)
लढत आहोत. त्याबाबत वेळोवेळी जे मागितले ते सर्व सहकार्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून आपल्याला मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की मल्हारी मार्तंड खंडोबा नक्कीच आपल्याला या लढाईत यश देईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा, प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

IPS Rashmi Shukla | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा! फोन टॅपिंग प्रकरणातील 2 FIR वर
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Total
0
Shares
Related Posts