धक्कादायक ! धारदार शस्त्राने सपासप वार करुन युवा क्रिकेटपटूची हत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भांडुपमधील युवा क्रिकेटपटू राकेश पनवार यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भांडुपमधील महावीर पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. भांडुपमध्ये राहणारा राकेश पनवार हा विवाहित आहे. मध्यरात्री राकेश महावीर पेट्रोलपंपाजवळ आला असताना अगोदरच दबा धरुन बसलेल्या तिघा मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या राकेशचा जागीच मृत्यु झाला.

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.