Bharat Jodo Yatra | देशमुख बंधूंची अनुपस्थिती आणि प्रकाश आंबेडकरांच्या भाकितावर काँग्रेसचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेनिमित्त भारत भ्रमणावर आहेत. केरळमधून सुरु झालेली त्यांची ही यात्रा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली आहे. सध्या ही ‘भारत जोडो यात्रा’ नांदेड जिल्ह्यातुन जात आहे. महाराष्ट्रात ‘भारत जोडो यात्रेनिमित्त’ (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी १४ दिवस प्रवास करणार आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे (Maharashtra Congress) सर्व नेते सहभागी झाले आहेत. मात्र, माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) पदयात्रेत गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

 

‘भारत जोडो यात्रा’ ही कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत निघाली आहे. यात्रेत राज्यातीलच नव्हे तर काँग्रेस व देशातील इतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते सहभागी होत आहे. मात्र, अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे अद्यापही ‘भारत जोडो यात्रे’त (Bharat Jodo Yatra) सहभागी झालेले नाहीत. शिवाय काही दिवसांपूर्वी बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होत आहे. ‘काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडवणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील’ असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले होते. यावर आता काँग्रेसचे नेते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘या चर्चा पूर्णपणे निरर्थक असून नांदेडनंतर ‘भारत जोडो यात्रा’ ११ नोव्हेंबरला हिंगोलीत प्रवेश करणार आहे.
हिंगोलीची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे आहे, या यात्रेच्या व्यवस्थापनेत धीरज देशमुखही अमित देशमुखांची मदत करत आहेत.
त्यामुळे ते नांदेडमधील यात्रेत सहभागी झाले नाहीत. अशी विधानं भाजपा काही लोकांच्या तोंडातून वधवत असून, तसे काही होणार नाही.
काँग्रेस एकसंघ असून, भाजपाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात खंबीरपणे उभी आहे,’ असे राजू वाघमारे यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title :- Bharat Jodo Yatra | amit deshmukh and dhiraj deshmukh join bharat jodo yatra in hingoli say raju waghmare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Atul Bhatkhalkar | संजय राऊतांच्या कटुता संपवण्याच्या वक्तव्यावर अतुल भातखळकर यांचा टोला म्हणाले -‘फक्त याची सुरुवात त्यांनी…’

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

Jacqueline Fernandez | आता न्यायालयाकडून ही ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; “जॅकलिनला अद्याप अटक का नाही?”