Bharat Sasane | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bharat Sasane | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Sahitya Sammelan) अध्यक्षपदी भारत सासणे (Bharat Sasane) यांची निवड करण्यात आली आहे. साहित्या महामंडळाची आज उदगीर येथे बैठक झाली. या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. हे संमेलन 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी होणार आहे.

भारत ससाणे हे वैजापूर येथे एप्रिल 2020 मध्ये झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. भारत सासणे (Bharat Sasane) हे वसमत येथे आयोजित 35 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

भारत सासणे यांची साहित्य संपदा –
अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह), अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह), आतंक (दोन अंकी नाटक), आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह), ऐसा दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह), कँप/बाबींचं दु:ख (दीर्घकथा संग्रह), चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका), चिरदाह (दीर्घकथा संग्रह), जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी), चिरदाह (दीर्घकथा संग्रह), जॉन आणि अंजिरी पक्षी (लेखकाचा पहिला कथासंग्रह), त्वचा (दीर्घकथा संग्रह), दाट काळा पाऊस (दीर्घकथा), दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका), दोन मित्र (कादंबरी), नैनं दहति पावक:, बंद दरवाजा (कथासंग्रह), मरणरंग (तीन अंकी नाटक), राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी), लाल फुलांचे झाड (कथासंग्रह), वाटा आणि मुक्काम (सहलेखक – आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया), विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह).

 

 

Web Title :- Bharat Sasane | Bharat Sasane elected as the President of the 95th All India Marathi Literary Conference

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Early Bird Benefit Scheme | महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत वाढवली ‘अर्ली बर्ड बेनिफिट योजना’, ‘या’ वाहनांवर मिळतोय लाभ

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 76 वर्षीय आईला मेडिसीनचा ओव्हरडोस दिल्यानंतर ‘फाशी’ देऊन खून, 42 वर्षीय ‘इंजिनिअर’ गणेश फरताडेची धनकवडी परिसरात आत्महत्या; प्रचंड खळबळ

 

Dry Fruits-Immunity | हिवाळ्यात इम्युनिटी वाढवतील ‘हे’ ड्रायफ्रूट्स, सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने दूर होऊ शकतात अनेक आजार

 

Morning Habits-Weight Loss | सकाळी उठताच केली ‘ही’ 5 कामे तर फटाफट कमी होईल वजन, ‘या’ चूका वाढवू शकतात लठ्ठपणा