Dry Fruits-Immunity | हिवाळ्यात इम्युनिटी वाढवतील ‘हे’ ड्रायफ्रूट्स, सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने दूर होऊ शकतात अनेक आजार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dry Fruits-Immunity | सकाळी-सकाळी ड्रायफ्रूट्सचे सवेन केल्याने अनेक प्रकारच्या आजारापासून बचाव करता येऊ शकतो. शरीर हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी सुकलेल्या फळांचे सेवन केले जाते. ड्रायफ्रूट्स चांगल्या आरोग्यासाठी खुप परिणामकारक आहे. सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले नट्स खाल्ल्याने इम्युनिटी बूट्स होऊ शकते आणि या कारणामुळे तुम्ही वारंवार आजारी पडण्यापासून वाचू शकता. (Dry Fruits-Immunity)

 

निरोगी आणि तंदुरुस्त शरीर मिळविण्यासाठी ड्रायफ्रूट्सचे सेवन केले जाते. असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्सचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. आहारात या ड्रायफ्रूट्सचा महत्त्वाचा वाटा असतो. रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खाल्लयाने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहू शकता. तसेच शरीर निरोगी राहू शकते.

 

ड्रायफ्रूट्सचे फायदे जाणून घेवूयात…

 

काजूने घ्या हृदयाची काळजी :
काजूमध्ये इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत कमी फॅट असते. काजूमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असते. मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. (Dry Fruits-Immunity)

 

याशिवाय काजूमध्ये जास्त फॅट्स आढळतात ज्यांना गुड फॅट्स म्हणतात. यासोबतच काजू हे झिंक आणि आयर्नसह मॅग्नेशियमचाही चांगला स्रोत आहे. आयर्न पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते, तर मॅग्नेशियम स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते.

पिस्त्याने हृदयविकाराचा धोका कमी करा :
पिस्त्यात आढळणारे व्हिटॅमिन ई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दिवसातून 5 ते 7 पिस्ते खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. एका पिस्त्यात सुमारे 4 कॅलरीज असतात. पिस्त्यांमध्ये एल-आर्जिनिन आढळते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे अस्तर अधिक लवचिक होते. या कारणास्तव, हृदयामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता कमी होते.

 

शेंगदाण्याचे उपयोग :
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे शेंगदाणे उपलब्ध आहेत.
अनेक फ्लेवर आणि मसालेदार शेंगदाण्यामध्ये विविध पोषक घटक असतात.
घरी भाजलेले शेंगदाणे आणि मध यांचे पीनट बटर बनवता येते.

 

 

Web Title :- Dry Fruits-Immunity | dry fruits will increase immunity in winter many diseases can be overcome by eating empty stomach in the morning

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Habits-Weight Loss | सकाळी उठताच केली ‘ही’ 5 कामे तर फटाफट कमी होईल वजन, ‘या’ चूका वाढवू शकतात लठ्ठपणा

 

Hallmarking | आता वडिलोपार्जित दागिन्यांवरही असेल शुद्धतेचा शिक्का, जाणून घ्या किती आहे जुन्या सोन्याचे हॉलमार्किंग शुल्क

 

Multibagger Penny Stocks | 2021 मध्ये सर्वात जास्त रिटर्न देणारा शेयर बनला ISGEC ! 1 लाख रुपयांचे बनवले जवळपास 4 कोटी