Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 76 वर्षीय आईला मेडिसीनचा ओव्हरडोस दिल्यानंतर ‘फाशी’ देऊन खून, 42 वर्षीय ‘इंजिनिअर’ गणेश फरताडेची धनकवडी परिसरात आत्महत्या; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस (Medicine Overdose) देऊन त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांचा खून (Murder in Pune) केला व त्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ (Pune Crime) उडाली आहे.

 

 

गणेश मनोहर फरताडे Ganesh Manohar Fartade (वय 42) आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे Nirmala Manohar Fartade (वय 76, रा. अक्षय गार्डन सोसायटी, धनकवडी) असे या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी गणेश याची मावस बहिण यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे व आपली आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये (Dhankawadi News) रहात होते. गणेशला काही कामधंदा नव्हता. तसेच त्याच्यावर कर्जही झाले होते. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे तो त्रासला होता. या कारणावरुन त्याने आईला औषधाचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्‍यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्‍या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून तिचा खून (Pune Crime) केला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. तेथील लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस निरीक्षक मुलाणी अधिक तपास करीत आहेत.

 

गणेश फरताडे हा इंजिनिअर होता अशी माहिती समोर आली आहे. त्याची आई खूप आजारी असायची. औषधांना खूप खर्च होत होता.

 

Web Title :-  Pune Crime | Shocking ! 76 year old mother hanged in Pune after overdosing medicine, 42 year old Ganesh Fartade commits suicide in Dhankawadi area; Huge excitement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dry Fruits-Immunity | हिवाळ्यात इम्युनिटी वाढवतील ‘हे’ ड्रायफ्रूट्स, सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने दूर होऊ शकतात अनेक आजार

 

Morning Habits-Weight Loss | सकाळी उठताच केली ‘ही’ 5 कामे तर फटाफट कमी होईल वजन, ‘या’ चूका वाढवू शकतात लठ्ठपणा

 

Hallmarking | आता वडिलोपार्जित दागिन्यांवरही असेल शुद्धतेचा शिक्का, जाणून घ्या किती आहे जुन्या सोन्याचे हॉलमार्किंग शुल्क

 

Multibagger Penny Stocks | 2021 मध्ये सर्वात जास्त रिटर्न देणारा शेयर बनला ISGEC ! 1 लाख रुपयांचे बनवले जवळपास 4 कोटी

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोनाचा उद्रेक ! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 9 हजार 170 नवे रूग्ण; जाणून घ्या आकडेवारी