Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 संपन्न

पुणे : Bharti Vidyapeeth | दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे येथे दिनांक 31 मार्च 2023 रोजी दिमाखात पार पडला. या स्पर्धेत देशभरातील 243 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. (Bharti Vidyapeeth)
मा. डॉ. एस. एम. सगरे सहकार्यवाह, भारती विद्यापीठ पुणे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. डॉ. एम. आर. जाधव सहाय्यक संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय पुणे विभागीय कार्यालय हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. गोदरेज अँड बॉईस शिरवळ संकुलाचे प्रमुख सुनील बेलोशे हे या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे होते. (Bharti Vidyapeeth)
टेक्नो इनोव्हा 2023 च्या सहसंयोजिका प्रा. अश्विनी गोखले यांनी स्पर्धेच्या निकालाचे वाचन केले. विविध गटातील विद्यार्थ्यांना सुमारे साठ हजार रुपयाची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री. राजेंद्र उत्तुरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. (Pune News)
विद्यार्थी प्रतिनिधी तनया कोऱ्हाळकर व अरिहंत आवटे यांनी टेक्नो इनोव्हा 2023 च्या अहवालाचे वाचन केले.
या सर्व स्पर्धेच्या मुख्य संयोजिका प्रा. सुजाता पाटील यांनी सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले.
अर्फिया शिकलगार आणि शिवांश मेनन या विद्यार्थ्यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.
Web Title :- Bharti Vidyapeeth | Techno-Inova 2023 concluded at Jawaharlal Nehru Tanrniketan, Bharati University
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या