Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime News | ५० हजार रुपये व्याजाने घेतले असताना त्याचे अडीच लाख रुपये परत केले. तरीही आणखी ५५ हजार रुपये मागून पैसे न दिल्यास पतीचे अपहरण (Kidnapping) करुन शेतावर कामावर ठेवतो, अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत चंदननगरमधील एका ४५ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद
(गु. रजि. नं. १३९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भागवत पांडुरंग छत्रे Bhagwat Pandurang Chhatre
(वय ४८, रा. गणेश पार्क, कावडे वस्ती, खांदवेनगर ) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेबर २०१२ पासून
२० मार्च २०२३ पर्यंत सुरु होता. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती यांनी भागवत छत्रे याच्याकडून दरमहा ५ टक्के व्याजाने ५० हजार
रुपये घेतले होते. त्यांच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी त्याला फेब्रुवारी २०२३ पर्यंत अडीच लाख रुपये परत केले आहेत.
तरीही भागवत हा रात्री अपरात्री वारंवार फोन करुन शिवीगाळ करतो. तुमचा तीन चाकी टेम्पो घेऊन जातो.
तुम्हाला व तुमच्या पतीला टेम्पोमध्ये टाकून माझ्या गावाला घेऊन जातो व माझ्या शेतामध्ये पैसे फिटेपर्यंत कामाला ठेवतो,
अशा वारंवार धमक्या देत आहेत. तसेच त्याने २० मार्च २०२३ रोजी फिर्यादींना फोन करुन मुद्दल ५० हजार व त्यावरील व्याज ५ हजार
असे रुपये एकूण ५५ हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवर टाक असे म्हणून आणखी पैशांची मागणी करुन पैसे दिले नाही तर काय होते ते बघ
असे म्हणून धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक कुमरे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PAN Card वर घरबसल्या बदलू शकता आपला फोटो, अतिशय सोपे आहे हे काम; फक्त मोबाईल आणि इंटरनेटची गरज
Pune PMC Election 2022 | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर (व्हिडीओ)