Bhaskar Jadhav | 100 रुपयांच्या शिधावरुन भास्कर जाधवांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महागाईने डोके वर काढले आहे. तसेच परतीच्या पावसाचा फटका सर्वांना बसला आहे. त्यामुळे अन्न-धान्य, भाज्या आणि फळे महाग झाली आहेत. तरी देखील गोरगरिबांची दिवाळी (Diwali Festival) गोड व्हावी, यासाठी राज्य सरकारने (State Government) 100 रुपयांत शिधा योजना राबविली आहे. त्यावर आता शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सरकारवर हल्ला केला आहे. शिधा पॅकेटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटो छापले, म्हणून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सरकारवर टीका केली आहे.

परतीच्या अवकाळी पावसाने (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काही लोकांचे पीक वाचले आहे, पण पाण्यामुळे ते कुजून जात आहे. अशावेळी सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा मोठा गाजावाजा केला. पाठ थोपटून घेत शिधा पॅकेटवर स्वत:चे फोटो छापले, अशा शब्दांत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सुनावले.

तसेच लोकांना 100 रुपयांचा आनंदाचा शिधा दिला आहे. 100 रुपयांत दिवाळी साजरी होते का? पावसामुळे आणि झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी (Farmer) दुखवला आहे. आणि तुम्ही त्याला 100 रुपयांचा शिधा देऊन त्याच्या जखमेवर मीठ चोळत आहात. त्यात देखील काही मंत्री स्वत: शिधा वाटप करत होते. पण, शिधा वाटप हे दिवाळी सण साजरी करणाऱ्यांची कुचेष्टा आहे, असे देखील भास्कर जाधव म्हणाले.

परतीच्या पावसाने केलेले नुकसान पाहता, यंदा शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत संक्रात कोसळली आहे.
मका, कापूस, सोयाबीन आदी पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्याला मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी रेशनकार्डधारकांना ही दिवाळी गोड जावी,
यासाठी रेशन दुकानांवर (शिधा वाटप केंद्र) 100 रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळ आदी घरघुती वस्तुंचे कीट वाटप केले आहे.

Web Title :- Bhaskar Jadhav | bhaskar jadhav attacks on cm eknath shinde and devendra fadnavis over anandacha shidha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदार भाजपमध्ये जाणार? राष्ट्रवादीचा मोठा दावा

Gulabrao Patil | भोसरी भूखंड प्रकरणावर गुलाबराव पाटलांनी खडसेंना डिवचलं, म्हणाले-‘… म्हणून हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले’