Bhaskar Jadhav | ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन | निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) स्वायत्त असल्यासारखे काम करत नाही. असा आरोप ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. शिंदे गटाचे म्हणणे निवडणुक आयोगाकडून अंधेरी पोटनिवडणुकीत मान्य करण्यात आली. त्यामुळे आमचा निवडणूक आयोगावर विश्वास बसत नाही. असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला. सध्या शिवसेना (Shivsena) पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे कुणाला मिळणार? याबाबत निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यातच भास्कर जाधव यांच्या निवडणुक आयोगाबाबतच्या या वक्तव्याने एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

आज (दि.२१) भास्कर जाधव हे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ‘ शिवसेनेतील वादात निवडणूक आयोगाने आपली स्वायत्तता कितपत पणाला लावायची? अंधेरी पूर्व मतदार संघाच्या निवडणुकीत शिंदे गटाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह, पक्षाचं हे नाव गोठवायला सांगितलं. निवडणूक आयोगानं ते ऐकलं सुद्धा. हे निवडणूक आयोगाचं काय चाललंय? आयोगाची ही भूमिका त्यांच्या स्वायतत्तेला धरून नाही. स्वायतत्ता आहे, यावर विश्वास ठेवण्याइतपत नाही, असं माझं मत आहे.’ असे मत त्यांनी निवडणूक आयोगावर व्यक्त केले.

तसेच, यावेळी बोलताना त्यांनी (Bhaskar Jadhav) भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरु असून देशात छोटे पक्ष शिल्लक राहता कामा नये, अशी भाजपची (BJP)
रणनीती आहे. भाजपच्या डोक्यात सध्या सत्तेची नशा आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी भाजपवर केली.

रामदास कदम यांच्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस संपवला,
अशी भूमिका मांडली जातेय. पण त्यांच्या या अति बोलण्यामुळे मी माझी भूमिका घेतली आहे.
दापोलीत पुढचा आमदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असेल.
मी ही जबाबदारी घेतली असून राजकीय ऑपरेशनच करणार.’
असे यावेळी बोलताना ते म्हणाले.

दरम्यान, निवडणुक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणी वर पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले,
निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्षासंबंधी महत्त्वाची सुनावणी सुरू आहे.
येत्या ३० जानेवारी रोजी आयोग पक्षासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
ठाकरे तसेच शिंदे गटाला आयोगाने लेखी पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष येत्या ३० जानेवारी रोजीच्या सुनावणीकडे लागलं आहे.

Web Title :- Bhaskar Jadhav | bhaskar jadhav reaction on election commission shivsena party case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahesh Bhatt | परवीन बाबी यांच्यासाठी पत्नी व मुलीला सोडलेल्या महेश भट्ट यांनी अभिनेत्रीबाबत केला हा खुलासा

Maharashtra Politics | ‘मविआ’ सरकारच्या काळात बंद केलेली ही योजना झाली परत सुरू; या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते सरकारसोबत काम करण्याची संधी