Mahesh Bhatt | परवीन बाबी यांच्यासाठी पत्नी व मुलीला सोडलेल्या महेश भट्ट यांनी अभिनेत्रीबाबत केला हा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री परवीन बाबी 70-80 च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री होत्या. अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री परवीन बाबी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होत्या. चाहत्यांबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा काळजाचा ठोका त्यांनी चुकवला होता. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्याबरोबरील प्रेमसंबंधाचाही बरीच चर्चा रंगली होती. 1977 मध्ये परवीन त्यांच्या करिअरच्या टॉपला असताना महेश भट्ट यांच्या प्रेमात होत्या. कबीर बेदींशी ब्रेकअप झाल्यानंतर त्या महेश भट्ट यांच्यासोबत होत्या, पण महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचं आधीच लग्न झालं होतं. असं असूनही महेश भट्ट आपल्या पत्नीला सोडून परवीन यांच्यासोबत एकत्र राहू लागले होते.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी परवीनबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला होता. “1979 मधील हा प्रसंग आहे. मी परवीनच्या जुहू येथील घरी तिच्या आईला बघण्यासाठी गेलो होतो. तिच्या आईला भेटल्यानंतर त्यांनी मला “परवीनला काय झालंय ते पाहा” असं सांगितलं. त्यानंतर मी परवीनच्या बेडरुममध्ये तिला पाहण्यासाठी गेलो”, असता परवीन हातपाय घट्ट पकडून बसली होती. परवीनने एका चित्रपटातील ड्रेस परिधान करत पेहराव केला होता. ती तिची चाल एका पशूसारखी मला भासली. तिच्या हातात किचनमधील चाकू होता. तू काय करतेस?, असं मी तिला विचारलं. त्यावर ती मला, शू ..…काही बोलू नकोस. ह्या बेडरुममध्ये हेरगिरी यंत्र लावलेली आहेत. हे झुंबर ते माझ्यावर पाडणार आहेत”, असं म्हणत तिने माझा हात पकडून मला खोलीच्या बाहेर काढलं. तिच्या आईकडे बघून यापूर्वीही असं घडलेलं आहे, हे मला जाणवलं.

पुढे ते म्हणाले कि “एका मनोतज्ञाकडे मी परवीनला घेऊन गेलो होतो. तिला सिजोफ्रेनिया हा अनुवंशिक आजार
असल्याचं त्यांनी मला सांगितलं. यावर उपचार म्हणून त्यांनी ड्रग थेरेपीचा सल्ला दिला होता.
परंतु, याने फरक न पडल्यास तिला इलेक्ट्रिक शॉकही द्यावा लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.
पण मरणाच्या भीतीने तिला झपाटलं होतं. एकदा माझ्या मित्राला भेटून परतत असताना तिने गाडीत बॉम्ब आहे.
त्याची टिकटिक मला ऐकू येत आहे, असं म्हणत गाडी चालू असतानाच दरवाजा उघडून पळायला सुरुवात केली.
तिच्यामागोमाग तिला पकडण्यासाठी मी धावत होतो. कसं तरी मी तिला टॅक्सीत बसवून घरी सोडून आलो”,
असा खुलासाही त्यांनी केला होता. परवीन बाबीचा मृत्यू होऊन आज 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.
20 जानेवारी 2005 रोजी अत्यंत दयनीय स्थितीमध्ये त्यांचं निधन झालं.
22 जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या फ्लॅटमधून बाहेर काढण्यात आला होता.
परवीन बाबी यांनी आत्महत्या केली होती, की त्यांचा मृत्यू झालेला हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

Web Title :-Mahesh Bhatt | when mahesh bhatt revealed that parveen babi had schizophrenia hold kichen knife in hand incident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Sachin Ahir | ‘पीएला त्यांनी जी पदं दिली, आज त्याच पदावर त्यांना समाधान मानावे लागत आहे’; ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची विजय शिवतारे यांच्यावर टीका