Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis & Ajit Pawar | आधी मुख्यमंत्र्यांची हिंमत नव्हती, आता अजितदादांच्या निर्णयाला उपमुख्यमंत्री फडणवीस स्थगिती देतात – भास्कर जाधव

कोल्हापूर : Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis & Ajit Pawar | शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते (Shivsena Thackeray Group) भास्कर जाधव सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी येथे राज्य मंत्रिमंडळ विस्तार, मराठा आरक्षण, नांदेड शासकीय रुग्णालय मृत्यूतांडव आदी विषयांवरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीवर देखील भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांचे महत्व कमी करत असल्याचे ते अप्रत्यक्षपणे म्हणाले. (Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis & Ajit Pawar)

भास्कर जाधव म्हणाले, अजित पवार यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. दादा ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करायचे, त्यांचीही दादांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची हिंमत नव्हती. पण आज महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या निर्णयाला स्थगिती देतात. आज दादांना खायचे दात आणि दाखवायचे दात कसे असतात हे समजले असेल. (Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis & Ajit Pawar)

भाजपावर टीका करताना जाधव म्हणाले, सबका साथ, सबका विकास या भाजपच्या फक्त गप्पा आहेत. त्यांना फक्त धनदांडग्यांचा, चेल्यांचा विकास करायचाय. जनतेला वाऱ्यावर सोडायचंय. त्यामुळे सर्व समाज-घटकांच्या विकासाच्या गप्पा फोलपणा आहे.

स्वपक्षातील नेत्यांना चिमटे काढताना ते म्हणाले, आमच्या लोकांना काय कामं नाहीयेत, त्यांना मंत्रिपद मिळूदे अगर पालकमंत्री. त्यांची चौकशी करण्याचं आपल्याला काय पडलंय. ते मेले काय आणि गेले काय, आम्हाला फरक नाही पडला पाहिजे. ते आता आपल्यातून पलीकडे गेले आहेत ना. उलट त्यांचा आणखी छळ व्हावा, त्यात मला आनंद आहे.

मराठा आरक्षणावर भास्कर जाधव म्हणाले, आरक्षणाचा उद्रेक होण्यास भाजपा आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची पाहिली कॅबिनेट अजून झालेली दिसत नाही वाटतं.
मराठा समाजाला आघाडीच्या काळात आरक्षण मिळाले होते, त्याचा लाभही मिळाला होता.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि हे आरक्षण गेले. सरकार बदलून दीड वर्ष झालं तरी उद्धव ठाकरे यांना दोष देतात.

जाधव म्हणाले, कोरोनाचा काळ असताना उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले.
निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक समाजाला शब्द द्यायचा, त्यांना फसवण्याचा उद्योग भाजपने सुरु केला.
२०२४ ला देशात आणि राज्यात भाजपचे सरकार येणार नाही. कारण, प्रत्येक समाजाला दुखावण्याचे काम काम
देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यामध्ये पुन्हा राडा ! कैद्यावर धारदार वस्तूने वार

ACB Trap News | 10 हजार रुपये लाच घेताना विस्तार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात