Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांचा भाजपवर पलटवार; म्हणाले – ‘काट्याचा नाय…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bhaskar Jadhav | राज्यात याकूब मेमनच्या कबरीच्या (Yakub Memon Grave) सुशोभीकरणावरून भाजपने हैदोस मांडला आहे. काट्याचा नायटा करायचा प्रयत्न सुरु आहे. गणपतीसारख्या उत्सवामध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी खोटे आरोप भाजपचे नेते करत आहेत. तुम्हीच याकूब मेमनची बॉडी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली. त्याचे थडगे तुम्ही उभे केले. त्याबद्दल माफी मागा, असे म्हणत शिवसेना नेते (Shivsena Leader) भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पलटवार केला आहे.

 

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवली होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यावर भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांना भास्कर जाधव यांनी उत्तर दिले आहे. (Bhaskar Jadhav)

 

याकूब मेमन कबर सुशोभीकरणावरून भाजपा आणि शिवसेना एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. आता देखील भास्कर जाधव यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपानेच याकूब मेमनची बॉडी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली. त्याचे थडगे बांधले आहे. त्याबद्दल माफी मागावी, असे जाधव यांनी म्हटले आहे. आता भाजपा यावर कोणता खुलासा करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी अमरावती लव्ह जिहाद प्रकरणावर सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार राडा केल्याने जाधव म्हणाले,
भाजपाच्या सहयोगी खासदारांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला.
मुलगी पळवून नेली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये हैदोस घातला. तो उभ्या देशाने बघितला. ती मुलगी सातार्‍यात सापडली आहे.

 

Web Title :- Bhaskar Jadhav | shivsena mla bhaskar jadhav reply bjp leaders over yakub memon grave controversy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune-Solapur Road Accident | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मयलेकींना धडक, महिलेचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

 

MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

 

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स