Bhidewada Smarak Issue Solved | ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न निकाली! High Court तील खटला पुणे महापालिकेने जिंकला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhidewada Smarak Issue Solved | देशातील मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु झाली तो भिडेवाडा न्यायालयाच्या (High Court) प्रक्रियेत अडकला होता. अखेर हा प्रश्न निकाली लागला आहे. भिडेवाड्या संदर्भात सुप्रीम कोर्टातील खटल्याचा निकाल पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) बाजूने लागला आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणाचे स्मारकात रुपांतर करण्याचे काम सुरु केले जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ही माहिती दिली. (Bhidewada Smarak Issue Solved)

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. शासनाकडून निधीची तरतूद झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. (Bhidewada Smarak Issue Solved)

या भेटीत त्यांनी भिडेवाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली होती. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानुसार महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. लवकरच आता भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर होईल, याबद्दल सर्व पुणेकरांचे अभिनंदन, असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://x.com/ChDadaPatil/status/1713882245600248163?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘पुण्याचे कारभारी बदलले आहेत, त्यामुळे…’, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचे रणशिंग

Rahul Narvekar On Supreme Court | सर्वोच्च न्यायाल्याने सुनावल्यानंतर नार्वेकरांची थेट प्रतिक्रिया,
म्हणाले – ‘मी कोर्टाच्या आदेशांचा आदर ठेवेन, पण…’