Bhiwandi Crime | खानावळीतील महिलेसोबत ‘झेंगाट’, अनैतिक संबंधातून चिमूरड्याचं अपहरण करुन काढला काटा

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Bhiwandi Crime |खानावळीसाठी घरी येणाऱ्या कामगाराचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) जुळले. या संबंधामध्ये अडसर ठरत असलेल्या आठ वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण (Kidnapping) करुन त्याचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर (Bhiwandi Crime) आली आहे. ही घटना भिवंडी (Bhiwandi Crime) येथील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या (bhoiwada police station) हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused Arrest) केली आहे. भिवंडीत (Bhiwandi News) घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (Bhiwandi Crime | immoral relationship with married woman kidnap and murder 8 years boy in bhiwandi)

जितेंद्र मधेशिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं चिमूरड्याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपी जितेंद्र हा भिवंडी तालुक्यातील कारीवली गावातील एका कुटुंबाच्या घरी खानावळीसाठी येत होता. याच दरम्यान कुटुंबातील एका महिलेसोबत त्याचे सूत जुळलं. घरी जेवणासाठी आल्यानंतर तो महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, आईचे आणि जितेंद्रचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मुलाला समजली. यानंतर मुलाने याबाबतची माहिती आपल्या वडिलांना दिली.

मुलाचे अपहरण करुन खून

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समजल्यानंतर संबंधित महिलेच्या पती आणि आरोपी यांच्यात बाचाबाची झाली. याचा राग आरोपीच्या मनात होता. अनैतिक संबंधाला मुलगा अडसर ठरत असल्याने मुलाचे अपहरण केले. अपहरण करुन त्याचा गळा आवळून खून केला. बराचवेळ झाला मुलगा दिसत नसल्याने वडिलांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नसल्याने त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात (Bhoiwada police station) धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पहाटे आढळला मृतदेह

शुक्रवारी (दि.16) पहाटे 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सापडला. या प्रकरणाची माहिती भाईवाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन तपास सरु केला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून संशयित आरोपी जितेंद्र मधेशियाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

खेळण्याच्या बहाण्याने नेऊन केला खून

अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने आरोपीने 8 वर्षाच्या मुलाला खेळण्याच्या बहाण्याने चौथ्या मजल्यावर नेले. त्याठिकाणी त्याने मुलाचा गळा आवळून खून केला, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
पोलिसांनी केवळ आठरा तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 21 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास भोईवाडा पोलीस करित आहेत.

Web Title : Bhiwandi Crime | immoral relationship with married woman kidnap and murder 8 years boy in bhiwandi

हे देखील वाचा

 

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू

Pune Crime | पुणे -पंढरपुर पालखी मार्गावर कुख्यात गुंड गणेश रासकरची
‘गेम’, डोक्यात गोळीबार करून केला ‘खात्मा’