’26 के भईल कमर’ गाण्यावर मोनालिसानं केला जबरदस्त डान्स ! खेसारीसोबत दिले अनेक ‘बोल्ड’ सीन्स (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि भोजपुरी सेंसेशन मोनालिसा यांचं गाणं सध्या सोशल मीडियावर राडा घालताना दिसत आहे. यात मोनालिसा आणि खेसारी यांची रोमँटीक केमिस्ट्री आहे जी चाहत्यांना खूप आवडली आहे. या गाण्यात दोघांनी खूपच रोमँटीक डान्स केला आहे. खास बात अशी की या गाण्यात मोनालिसाचा बोल्ड अंदाज दिसत आहे. दोघांच्या स्टीमी सीन्सनं चाहतेही घायाळ झाले आहेत.

खेसारी लाल यादव आणि मोनालिसाच्या या गाण्याचं नाव आहे 26 के भईल कमर. गाण्याबद्दल बोलायचं झालं तर हे गाणं नागिनं अल्बममधील आहे. फेमस भोजपुरी सिंगर इंदु सोनाली हिनं हे गाणं गायलं आहे. अनेकांनी कमेंट करत या रोमँटीक जोडीचं आणि मोनालिसाच्या बोल्ड अवताराचं कौतुक केलं आहे.

https://youtu.be/mIdOk9_vVKI

सध्या हे गाणं युट्युबवरील ट्रेंडिंग गाण्याच्या लिस्टमध्ये दिसत आहे. तसं पाहिलं तर हे गाणं खूप जुनं आहे. परंतु हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे की, सोशलवर ट्रेंड करताना दिसत आहे.

या गाण्यात माोनालिसाचा प्रचंड हॉट अवतार दिसत आहे. खेसारी आणि मोनालिसाचे अनेक बोल्ड सीन्सही आहेत. काही सीनमध्ये मोनालिसा बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे.