‘गोर करिया’ गाण्यात दिसला पवन सिंह आणि मोनालिसाचा ‘बोल्ड’ अंदाज ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भोजपुरी इंडस्ट्रीचा किंग म्हणवल्या जाणाऱ्या सुपरस्टार पवन सिंहचं एक गाणं सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. गाण्यात पवन सिंह आणि भोजपुरी सेंसेशन मोनालिसा यांची रोमँटीक केमिस्ट्री आहे. जी चाहत्यांना खूप आवडली आहे. या गाण्यात दोघांनी खूपच रोमँटीक डान्स केला आहे. खास बात अशी की या गाण्यात मोनालिसाचा बोल्ड अंदाज दिसत आहे.

पवन सिंह आणि मोनालिसाच्या या गाण्याचं नाव आहे गोर करिया. पवन सिंहचा सुपरहिट सिनेमा सरकार राजमधील हे गाणं आहे. या गाण्याची सध्या खूप चर्चा होत आहे. आतापर्यंत या गाण्याला युट्युबवर 24,313,145 म्हणजेच 2 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करत या रोमँटीक जोडीचं आणि मोनालिसाच्या बोल्ड अवताराचं कौतुक केलं आहे.

गाण्याबद्दल बोलायचं झांल तर गोर करिया हे गाणं पवन सिंह आणि हनी बनीनं गायलं आहे. मनोज मतलबी यानं या गाण्याचे लिरीक्स लिहिले आहेत. छोटे बाबानं या गाण्याला म्युझिक दिलं आहे. सध्या हे गाणं सोशलवर खूप गाजत आहे. चाहत्यांना हे गाणं प्रचंड आवडलं आहे.