भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना श्वसनात अडचण; उपचारांसाठी भोपाळहून मुंबईत दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची आज अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबई येथे आणण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांना चार्टर्ड विमानाने मुंबईत आणले. सध्या त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच प्रज्ञासिंह ठाकूर यांना शुक्रवारी रक्तदाबाचा (ब्लड प्रेशर) त्रास जाणवू लागला होता. तसेच त्यांना श्वास घेण्यातही अडचण येत असल्याचे खासदार ठाकूर यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी प्रज्ञासिंह यांना 19 फेब्रुवारीला डॉक्टरांच्या सल्ल्याने नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या नियमित तपासणीसाठी (रुटीन चेकअप) त्या रुग्णालयात गेल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून त्यावेळी सांगितले गेले.

2019 मध्ये खासदार

प्रज्ञासिंह ठाकूर यांना 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. त्यामध्ये त्या विजयीही झाल्या आहेत. सध्या त्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.