काय सांगता ! होय, चक्क महिला डॉक्टरच क्लिनिकमध्ये चालवत होती हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, पोलिसांची रेड, 10 जण ताब्यात

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे दवाखान्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अचानक धाड टाकून या रॅकेटचा भंडाफोड केला आणि १० जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की गायत्री सिंह नावाची महिला डॉक्टर हे सेक्स रॅकेट चालवत होती. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून १० जणांना ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेच्या डीएसपी अदिती भवसार यांनी सांगितले की, आरोपी गायत्री सिंह ही नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीक नाही. तिच्याकडे युनानी मेडिकल आणि सर्जरीची पदवी आहे. ती केवळ सेक्स रॅकेट चालवत नाही तर ती स्वत: सेक्स वर्कर असल्याचा आरोप आहे. डीएसपी भवसार म्हणाल्या की, दोन वर्षांपासून शहरातील गर्दी असलेल्या ठिकाणी हे रॅकेट सुरू आहे, परंतु पोलिसांनाही याची माहिती नव्हती. डीएसपी म्हणाल्या की, हे क्लिनिक दररोज दुपारी उघडते आणि रात्रीपर्यंत चालू राहते.

डीजीपीला मिळाली होती गुप्त माहिती
डीएसपी म्हणाले की, नुकतीच डीजीपी व्ही.के. सिंग यांना क्लिनिकमध्ये सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही तक्रार गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आली. तेव्हापासून, क्लिनिकच्या कार्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर संशय आल्यानंतर महिला कॉन्स्टेबलला आरोपांचे सत्य जाणून घेण्यासाठी क्लिनिकमध्ये पाठविण्यात आले. कामाची गरज असल्याचे सांगून महिला कॉन्स्टेबलने आरोपी महिला गायत्रीकडे संपर्क साधला. गायत्री महिला कॉन्स्टेबलला कामावर घेण्यास तयार झाली.

दोन वर्षांपासून चालले होते रॅकेट
त्यानंतर महिला हवालदाराने पोलिस पथकाला सतर्क केले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने क्लिनिकमध्ये छापा टाकला आणि 10 लोकांना अटक केली. यामध्ये 6 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. मुख्य आरोपी गायत्री अशोका गार्डन येथील रहिवासी आहे. तिने पोलिसांना सांगितले की तिचा नवरा देखील डॉक्टर आहे आणि त्याने 1996 मध्ये हे क्लिनिक भाड्याने घेतले होते. सन 2000 मध्ये नवऱ्याचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून ती हे क्लिनिक चालवत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती हे रॅकेट चालवत असल्याचेही सिंह यांनी कबूल केले.