भाजप VS काँग्रेस : मध्य प्रदेशात राजकीय नाट्य ! काँग्रेस ‘मास्टरस्ट्रोक’ लावण्याच्या तयारीत, बड्या नेत्यानं दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय उलथा-पालथी झाल्या. तर आता भाजप नेते मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्याची तयारी करत असल्याचा दावा करत आहेत. परंतु काँग्रेसकडूनही सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येत आहे. कमलनाथ सरकारचे मंत्री पीसी शर्मा यांनी मंगळवारी संध्याकाळी असेच काही संकेत दिले. पीसी शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणले की तुम्ही अजून मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक पाहिलेला नाही.

शर्मांच्या म्हणण्याचा अर्थ काय –
पीसी शर्मा यांनी माहिती देताना काही महत्वाचे संकेत दिले. माध्यमांनी जेव्हा त्यांना विधानसभेतील आमदारांच्या संख्येबाबत प्रश्न विचारले तेव्हा शर्मा म्हणाले, तुम्हाला कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक पहायला मिळेल. मुख्यमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक काय आहे हे तुम्ही सोमवारी संध्याकाळी होणाऱ्या भोपाळस्थित बैठकीत पाहू शकालं.

सोमवारी संध्याकाळी राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली. यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांचे जे हावभाव पाहायला मिळाले त्यानंतर याचा अंदाज लावला जाऊ लागला की काँग्रेस पडद्यामागे काही तरी खेळ खेळत आहे. या खेळामागे कमलनाथ यांच्या वक्तव्याला आधार मानले जात आहे. त्यात ते म्हणाले की आता आणखी ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. तर दुसरीकडे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ज्या अंदाजात भाजपवर हल्लाबोल केला त्यावरुन संकेत मिळत आहेत की काँग्रेस काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहे.

भाजपचे आमदार देखील फुटणार ?
मध्य प्रदेशात जेव्हा पासून काँग्रेस सरकार सत्तेत आले तेव्हापासून राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली होती. भाजप ज्या उत्साहाने सांगत आहे की त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना फोडले त्याच प्रकार काँग्रेस देखील तत्परतेने त्याला उत्तर देत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांची वक्तव्य आली की भाजपचे अनेक नेते कमलनाथ यांच्या संपर्कात आहेत. यात भाजपच्या त्या दोन नेत्यांची चर्चा सुरु आहे ज्यांनी कमलनाथ यांची भेट घेतली होती. त्यानंतर असे बोलले जात आहे की भाजपच्या ऑपरेशन लोटसला उत्तर देण्यासाठी काँग्रेस देखील काही तरी नवे करण्याच्या प्रयत्नात आहे.

याचेच संकेत म्हणून पीसी शर्मा यांनी मंगळवारी केलेले वक्तव्य की तुम्ही अद्याप कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक पाहिलेला नाही. यानंतर मध्यप्रदेशात आणखी काय राजकीय उलथापालथी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.