काय सांगता ! होय, महिला पोलिसानं भररस्त्यात महिलेच्या गालावर काढला ‘नकाशा’, मग महिलेनं कानशिलात लगावली

मध्य प्रदेश / भोपाळ : वृत्तसंस्था – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. तर अनेक लोक नियम धुडकावून विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. मध्य प्रदेश येथील एक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात लॉकडाऊन काळात पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या मायलेकींना थांबवून विचारणा केली असता तर उलट त्या मायलेकींनीच पोलिसांबरोबर वाद घातला आहे. तर रहली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, मास्क न घालता जाणाऱ्या मायलेकींना पोलिसांनी रोखून त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्या दोघींनी महिला पोलिसाला धक्काबुक्की केली. यानंतर त्या महिला पोलिसानी धक्का देणाऱ्या त्या महिलेच्या कानशिलात लावली. तर तात्काळ त्या महिलेने सुद्धा त्या महिला पोलिसांच्या थोबाडीत लगावली आहे. यावरून भडकलेल्या महिला पोलिसानं पुन्हा महिलेच्या कानशिलात लगावली. नंतर महिला पोलिसाने त्या महिलेचे केस धरून तिला ओढत नेले. त्यावेळी त्यास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी होणारा वाद थांबवला. या प्रकारावरून पोलिसांनी त्या आई आणि मुलीवर गुन्हा दाखल करून त्यांना कोठडीत टाकलं आहे.

या दरम्यान, आई आणि मुलगी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरत होत्या. त्यांना २ पोलिसांनी थांबवलं. मास्क न घालण्याबाबत विचारणा केली. तसेच, त्या दोघींना पोलिसांनी त्यांना दंड भरण्यास सांगितलं. म्हणून त्या माय लेकी या दोघींनी पोलिसांशी गैरवर्तन केले. आणि मारामारी झाली. या प्रकरणावरून पोलिसांनी मायलेकीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.