#BhujThePrideOfIndia : अजय साकारणार ‘त्या’ विंग कमांडरची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अजय देवगण आगामी वर्षात एका मोठ्या चित्रपटात झळकणार आहे. अजय भारत-पाक युद्धातील हवाई दलाचे विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. अजयने नुकतीच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून याबाबतची घोषणा केली आहे. ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ असं अजयच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. अजयचा महत्त्वाकांक्षी ‘तानाजी’ चित्रपट याच वर्षांत प्रदर्शित होत आहे.

१९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या योगदानावर हा चित्रपट असणार आहे. ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. कर्णिक हे भारत-पाक युद्धादरम्यान हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते. भारत पाकिस्तान युद्धावर यापूर्वी अनेक चित्रपट आले आहेत.

भारत पाकच्या या युद्धात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उध्वस्त झाली. यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आजूबाजूच्या गावातील महिलांकडे मदत मागून तळाची बांधणी करण्याची विनंती केली. यानंतर कर्णिक यांनी ३०० महिलांच्या मदतीने पुन्हा तळ बांधला. कर्णिक यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि हवाई दलाचे योगदान याची शौर्यगाथा या चित्ररटात असणार आहे.