‘या’ कायद्यातील बदलामुळे भुजबळ यांना जामीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा देखील जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. मागील २८ महिन्यापासून समीर भुजबळ कारागृहात होते. पीएमएलए कायद्यातील बदलामुळेच भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे.

नोव्हेंबर २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम ४५ घटनात्मकदृष्ट्या अवैध ठरवले होते. त्याच धर्तीवर छगन भुजबळ यांनी जामीन अर्ज केला आणि तो मंजूर करण्यात आला. तसाच जामीन अर्ज समीर यांनी देखील केला आहे. पीएमएलए कायद्यात २९ मार्च रोजी दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे आता समीर यांना जामीन देता येणार नाही असा ईडीचा युक्तीवाद केला होता. पण अखेर याच कायद्याच्या बदलामुळे समीर भुजबळ यांनाही तुरुंगाचे दार मोकळे झाले आहे.